मध्यम, सुक्ष्म व लघु उद्योगावर भर देण्यात येईल
विधिमंडळ अधिवेशन; अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार सभागृहात दाखल - राज्यमंत्री दीपक केसरकर
2019-06-18 14:37:53
2019-06-18 14:37:38
१ लाख ६७ शेततळ्यांचं काम पूर्ण
2019-06-18 14:32:45
सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनुदान देणार
2019-06-18 14:13:47
विधिमंडळ अधिवेशन; अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार सभागृहात दाखल
मुंबई - विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज सभागृहात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री मुनगंटीवार आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर सभागृहात दाखल झाले आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालावरून विरोधकांनी रान उठवले असले, तरी राज्याची आर्थिक स्तिथी उत्तम असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आश्वासनांची खैरात करण्याची शक्यता आहे.
या अर्थसंकल्पात मुनगंटीवार हे नेमक्या काय घोषणा करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता शेतकऱ्यांसह नागरिकांना लागून आहे.