मुंबई - आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) विधीमंडळात वर्ष 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प ( Budget Will Present In Assembly ) सादर करणार आहेत. दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. यंदा अर्थसंकल्पात अजित पवार नेमक्या काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
MH Assembly Budget Session 2022 : थोड्याच वेळात सादर होणार 'महाराष्ट्राचा अर्थसंकल्प', सर्वसामान्यांना काय मिळेल? - विधीमंडळ अर्थसंकल्प ताजे अपडेट
आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) विधीमंडळात वर्ष 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प ( Budget Will Present In Assembly ) सादर करणार आहेत. दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जाईल.
दरम्यान, काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या पाहणी अहवालात राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहण्याचा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित असल्याचेही या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आर्थिक पाहणी अहवालानूसार 2021-22मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषी कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.
हेही वाचा -Aditya Thackeray : ही तर सुरुवात! बाहेर राज्यात निवडणुका लढण्यावर आम्ही ठाम -आदित्य ठाकरे