मुंबई -मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका संपूर्ण मराठवाड्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत काल (8 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने या सर्व परिसरामध्ये पंचनामे करण्याचे सूचना दिले आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांमधील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगितले. आज (गुरूवार) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गात मोठे बदल होत आहेत. या बदलांमुळे अतिवृष्टी होणे, पूर येणे, नद्यांचे प्रवाह बदलणे अशा प्रकारच्या घटना होत आहे. याचा फटका मराठवाड्यात देखील बसलेला असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
एनडीआरएफच्या मदतीचे निकष बदलण्याची गरज