मुंबई -चित्रपट निर्माते संदीप सिंग यांना ( Sandeep Singh received threat ) फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या ( Sidhu Moose Wala murder )हत्येच्या धर्तीवर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात अल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. चित्रपट निर्माते संदीप सिंह यांना बुधवारी फेसबुकवर धमकी देण्यात आली. कृष्णा सिंह राजपूत या फेसबुक खात्यावरून संदीप सिंह यांना धमकी आली आहे. आरोपीने त्यात लिहले आहे की, ‘चिंता मत करना, मुसावाला को गोली मारी गयी है. उसी तरहा तुझे भी मारा जाएगा, वेट कर और याद रख’, अशी धमकी सिंह यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी धमकी देणाऱ्या फेसबुक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -Abu Azmi Threat : अबू आझमींना धमकी देणाऱ्या युवकाला पुण्यातून अटक
अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवर राहणारे सिंग यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून धमकीची तक्रार दिली. त्यानंतर आंबोली पोलिसांनी एफआयआर नोंदवला. सिंग यांचे प्रवक्ते दीपक साहू यांनी सांगितले की, ज्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्याला ओळखत सिंह नाही. “आम्ही ही धमकीची गंभीर दखल घेतली घेतली असून पोलिस तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत,” अशी माहिती दीपक साहू यांनी दिली आहे.