महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BARG P -305 दुर्घटना : शापुरजी पालनजीवर गुन्हा दाखल करा; आशिष शेलार यांची मागणी - भाजप आमदार आशिष शेलार

या प्रकरणात शापुरजी पालनजी यांच्या संचालकांना वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील कुठला मंत्री त्यासाठी प्रयत्न करीत आहे? असा सवालही याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलार यांची मागणी
आशिष शेलार यांची मागणी

By

Published : May 26, 2021, 7:59 AM IST

मुंबई- बार्ज दुर्घटना प्रकरणात एफकाँन्सचे संचालक शापुरजी पालनजी यांच्यावर गुन्हा दाखल करा, संचालकांना वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील कुठला मंत्री त्यासाठी प्रयत्न करीत आहे, असा आरोप करत अखिल भारतीय नाविक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफकाँन्सचे संचालक मंडळ आणि शापूरजी पालनजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात बार्ज पी ३०२ वरील ओनएनजीसाठी काम करणारे 361 कर्मचारी अडकून पडले होते. त्यापैकी आतापर्यंत 188 जणांचे प्राण वाचविण्यात आले असून 70 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागलेले आहेत. त्यानंतर या प्रकरणी बार्जच्या कॅप्टनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संचालकावर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय नाविक संघटनेचे अध्यक्ष सुहास माटे, कार्याध्यक्ष अमोल जाधव, सरचिटणीस दिनानाथ जगाडे, उपाध्यक्ष जितेंद्र राऊत आणि राकेश चव्हाण यांच्यासह कामगार नेते मिलिंद तुळसकर यांचा यामध्ये समावेश होता.

या प्रकरणात शापुरजी पालनजी यांच्या संचालकांना वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील कुठला मंत्री त्यासाठी प्रयत्न करीत आहे? असा सवालही याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार आशिष शेलार यांनी केला.

या प्रकरणी कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हा का नोंद नाही. तेसच जो हजर नाही, आपली बाजू मांडू शकत नाही, अशा कॅप्टनवर गुन्हा दखल केला गेला. त्यामुळे संचालक सोडून कॅप्टनवर गुन्हा दाखल करण्याचा हा डाव मंत्रालयाच्या कुठल्या मजल्यावर शिजला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details