महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya : ठाकरे सरकारच्या 'डर्टी डझन'ला शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच राहील : किरीट सोमय्या - ठाकरे सरकार डर्टी डझन

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेल्या पैशांचा गैरवापर ( INS Vikrant Fund Fraud Case ) केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला ( Kirit Somaiya Got Bail From HC ) आहे. त्यावर सोमय्या यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली ( Kirit Somaiya Tweet ) आहे. ठाकरे सरकारच्या 'डर्टी डझन'ला ( Dirty Dozens Thackeray Sarkar ) शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे ते म्हणाले.

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या

By

Published : Apr 13, 2022, 2:55 PM IST

मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत प्रकरणी ( INS Vikrant Fund Fraud Case ) दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला ( Kirit Somaiya Got Bail From HC ) आहे. उच्च न्यायालयाने म्हटलंय की, १८ ते २२ एप्रिल दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेसमोर जा आणि तपासात सहकार्य करा. पोलिसांनी अटक केल्यास तात्काळ ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश न्यायालाने दिले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली ( Kirit Somaiya Tweet ) आहे.


काय आहे ट्विट मध्ये? :अंतरिम दिलासा/जामीन दिल्याबद्दल मी मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानतो. ठाकरे सरकारने रुपात ५७ कोटींच्या विक्रांत घोटाळ्याचा एकही कागदपत्र सादर केला नाही. ते उघड झाले आहे. जोपर्यंत ठाकरे सरकारच्या डर्टी डझनला ( Dirty Dozens Thackeray Sarkar ) शिक्षा होत नाही तोपर्यंत "घोटलेबाज" महाराष्ट्र सरकार विरुद्ध आमचा लढा सुरूच राहील असेही सोमय्या म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या ट्विट


काय आहे प्रकरण? : विमानवाहू जहाज INS विक्रांतला तोडण्यापासून वाचवण्यासाठी जमा केलेल्या ५७ कोटी रुपयांहून अधिक रकमेशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सत्र न्यालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. सोमय्या यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दावा केला होता की, सत्र न्यायालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात त्रुटी आहेत.

मोहीम पक्षाने चालवलेली : न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सोमय्या यांनी म्हटले होते की, 'तक्रार दाखल करण्यास विलंब झाला असून, ती तब्बल ९ वर्षांनी दाखल करण्यात आली आहे.' शिवसेना, काँग्रेससह इतर पक्षांकडूनही आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी निधी गोळा करण्यात आला होता, असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. पैसे गोळा करण्याची मोहीम त्यांनी वैयक्तिकरित्या चालवली नसून, ती पक्षाच्या पातळीवर चालवली होती, असं देखील सोमय्यांनी म्हटलंय. तत्पूर्वी, विशेष न्यायाधीश आर. के. रोकडे यांनी सोमय्या यांची याचिका फेटाळून लावली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details