मुंबई - राज्यात कोरोनाचे संकट कायम असताना शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना 50 टक्के उपस्थितीचा आदेश दिला आहे. यासंबंधी एक परिपत्रकही जारी केले आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या या परिपत्रकावर शिक्षक संघटनांनी जोरदार आक्षेप घेतले आहेत.
शिक्षकांना प्रवासासाठी स्वतंत्र यंत्रणा नाहीत. शिवाय शाळांमध्ये उपस्थित राहणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे शिक्षण विभागाने हे परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. राज्यात टाळेबंदीच्या विविध टप्प्यांतर्गत सर्व काही पूर्ववत करण्यात येत आहे. त्यानुसार आता राज्य सरकारने पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासंबंधी एक परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केले आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन आवश्यक