मुंबई -मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेत मतदान ( Voting permission denied ) करण्याची परवानगी देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. या कारणाने महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi )सरकारला मोठा झटका लागला आहे. याबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी या निर्णयाचे स्वागत करत, ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा कडक ( riticism on Thackeray government ) शब्दात ताशेरे ओढले आहेत. याबाबत बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना ही पंधरावी झापट मारली गेली आहे. आता मुख्यमंत्र्यांचे गाल सुजले आहेत. मागील राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने नाक कापून हातात दिले होते.
नवाब मालिक देशद्रोही -आता विधान परिषद निवडणुकीत कपडे उतरवले जाऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री काळजी घेत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते एकत्र येऊन याबाबत रणनीती आखत आहेत. नवाब मालिक दाऊद चा एजंट असून तो देशद्रोही आहे असे, कोर्टाने म्हटले आहे. आता ठाकरे सरकार कुठल्या कोर्टात जाणार? असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी या प्रसंगी उपस्थित केला.