मुंबई -खाद्यतेलातून होणाऱ्या भेसळीचा पर्दाफाश एफडीएने केले आहे. मुंबई महानगर प्रदेशात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री सुरुच आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने १६ मार्चला (एफडीए) वसईतील खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या दोन कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत ३2 लाख 50 हजार 567 रुपये किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
एफडीएने टाकलेल्या छाप्यात मे. ओमकार ट्रेडिंग कंपनी आणि मे शिवम ट्रेडिंग कंपनीत अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले. सर्वात गंभीर बाब म्हणजे येथे राजरोसपणे खाद्यतेलात भेसळ केली जात होती. खाद्यतेलाच्या पॅकिंगसाठी वापरलेल्या टीनचा पुनर्वापर केला जात असल्याचे दिसून आले. तर निश्चित वजनापेक्षा कमी खाद्यतेल टीनमध्ये भरले जात असल्याचेही यावेळी दिसून आले. भेसळयुक्त तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.