मुंबई -कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपी फादर स्टेन स्वामी यांच्या जामिनावर १५ मार्चला विशेष एनाआयए कोर्ट निर्णय देणार आहे. आजच्या सुनावणीवेळी एनआयएने दाखल केलेल्या नव्या कागदपत्रांना उत्तर देण्यासाठी फादर स्टेन स्वामी यांच्या वकिलांना वेळ लागल्यामुळे स्टेन स्वामी यांच्या जामीन अर्जाच्या निर्णयावर 15 मार्चपर्यंत विलंब झाला आहे. 83 वर्षीय फादर स्टेन स्वामी हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात अनेक महिन्यापासून कोठडीत आहेत.
गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला झाली अटक
आदिवासींसह काम करणारे कार्यकर्ते अशी फादर स्टेन ह्यांची ओळख आहेत. गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला त्याना रांची येथून अटक करण्यात आली होती आणि कोर्टाकडून थेट न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ते पार्किन्सन आजाराने ग्रसित आहेत. त्यांची श्रवणशक्ती कमी झाली आहे. तसेच लंबर स्पॉन्डिलायसिसमुळे ते त्रासलेले आहे. फादर स्वामींनी कोणत्याही बेकायदेशीर कृतीसाठी भाग घेतला किंवा ते अशा कामात वचनबद्ध होते किंवा त्यांनी बेकायेशीर काम करण्यास भडकावले किंवा कसे हे स्थापित करण्यात अभियोजन पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे या कारणावरून आरोपी पक्षाने जामीन मागितला. म्हणून, बेकायदेशीर कृती प्रतिबंध अधिनियम यूएपीएच्या कलम 13 लागू करणे शक्य नाही, असे आरोपीच्या वकिलांचे मत आहे.
'पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता'
अॅड. शरीफ शेख यांनी फादर स्वामींच्या बाजूने युक्तिवाद केला, की कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कार्यात त्यांचा सहभाग असल्याचे सूचविण्यासाठी फिर्यादींनी कोणतेही पुरावे रेकॉर्डवर आणले नाही, म्हणून यूएपीएचे कलम 16, 20 आणि 39 फादर स्वामींच्या खटल्याला लागू होत नाही. तथापि, एनआयएचे प्रतिनिधीत्व करणारे विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले, की स्वामी हे विस्थापन विरोधी जनविकास आंदोलन आणि पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संघटनांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच स्वामींनी माकपा (माओवादी) या संस्थेच्या कार्यात त्याचा सहभाग असल्याच दावा केला. फादर स्वामींनी पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतू एनआयएने पुराव्यांना परत मिळविण्यात यश मिळविले, अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली.