मुंबई -मुंबई पोलिसांच्या पथकाने एका 4 महिन्यांच्या अपहरण झालेल्या बाळाची सुटका केली. या बाळाला त्याच्या वडिलांनी एका मूल नसलेल्या तामिळनाडूतील एका जोडप्याला 4 लाखांना विकले होते. मुंबई पोलिसांनी याबद्दलची तक्रार येताच तपास केला असता या प्रकरणात एकूण 11 जणांना अटक केली आहे.
मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली असून तिला सध्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले
4 महिन्यांच्या मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश करून व्ही.पी रोड पोलिसांनी अकरा जणांच्या एका टोळीला अटक केली आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. इब्राहिम अल्ताफ शेख, मोहम्मद शेरखान ऊर्फ शेरु पीरमोहम्मद खान, लक्ष्मी दिपक मुरगेश ऊर्फ कोंडर, सद्दाम अब्दुल्ला शाह, अमजद मुन्ना शेख, ताहिरा ऊर्फ रेश्मा गुलाब नबी शेख, कार्तिक राजेंद्रन, चित्रा कार्तिक, तमिळ सेल्वन थंगराज, मूर्ती पलानी सामी आणि आनंदकुमार नागराजन अशी या अकरा जणांची नावे आहेत. या मुलीची तामिळनाडू येथे 4 लाख 80 हजार रुपयांना विक्री झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली असून तिला सध्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
इब्राहिम आणि बाळाची आई हे दोघे लिव्ह इनमधे राहात होते
3 जानेवारीला मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात अन्वरी शेख यांनी तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये लस देण्याच्या बहाण्याने आरोपी इब्राहिम शेखने 27 डिसेंबरला तिच्या घरातून बाळाला नेले. मात्र, तो परत आलाच नाही. तिने या प्रकरणात अखेर पोलिसांकडे धाव घेतली. बाळाची आई अन्वरी शेख यांच्याकडे बाळाला सोडून गेली होती. आरोपी इब्राहिम आणि बाळाची आई हे दोघे लिव्ह इनमधे राहात होते.
तिथे पाच जणांना अटक करून मुंबईत आणले
या घटनेतील मुख्य आरोपी इब्राहिम शेख हा आहे. तो मुलीला घेऊन गायब झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर मुंबईतील तपासासाठी पोलिसांनी अनेक पथक बनवली होती. मग सायन, धारावी, मालाड, जोगेश्वरी, नागपाडा, कल्याण आणि ठाणे या भागात आरोपीचा शोध घेतला. छापे टाकून दोन महिला आणि चार पुरुष अशा एकूण सहा जणांना अटक केली. त्यांनी अपहरण केलेल्या बलिकेला कर्नाटक, तामिळनाडू येथे नेलं असल्याचं त्यांनी सांगितल्यावर व्ही. पी रोड पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी विनायक पाटील यांनी दोन टीम बनवून तामिळनाडू येथे पाठवल्या. या टीमने अनेक तासांचा तपास करून तिथे पाच जणांना अटक करून मुंबईत आणले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे.
हेही वाचा -Nawab Malik On Up Election 2022 : राष्ट्रवादी आणि सपाची युतीबाबत बोलणी पूर्ण; नवाब मलिक