मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेता प्रशासकीय स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. त्याबरोबर मुंबई शहरात ज्या-ज्या ठिकाणी गर्दी जमा होते, अशा ठिकाणी तेथील आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला अनुसरून मुंबईतील प्रसिद्ध 'फॅशन स्ट्रीट' गेल्या 27 वर्षात पहिल्यांदाच बंद ठेवण्यात येत आहे.
'कोरोना' प्रभाव : 27 वर्षात पहिल्यांदाच मुंबईतील 'फॅशन स्ट्रीट' होणार बंद ! - आरोग्य मंत्री राजेश टोपे
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील अनेक मार्गातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 27 वर्षात पहिल्यांदा मुंबईतील 'फॅशन स्ट्रीट' 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
हेही वाचा...कोरोना इफेक्ट : गारगोटीत पार पडला केवळ 20 ते 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा
मुंबई शहरातील या फॅशन स्ट्रीटवर दिवसभरात एक ते दीड लाख नागरिक खरेदी करतात. मात्र, 31 मार्चपर्यंत येथील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास 350 ते 400 दुकान असलेल्या फॅशन स्ट्रीटवर काम करणारे कामगार हे त्यांच्या गावी जात असून इतर कामगार दुसऱ्या कामाच्या शोधात असल्याचे पाहायला मिळत आहेत.