महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Farmers Suicide विदर्भात 7 महिन्यात 810 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 'या' विभागात सर्वाधिक प्रकरणे - farmers suicide in Vidarbha

Farmers Suicide ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाच्या आणि श्रावणाच्या निमित्ताने उत्सवाची धूम होती. कोरोना नंतर पुन्हा एकदा उत्सवी वातावरण असताना, Most Cases In Vidarbha District विदर्भात मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच होते. ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Farmers Suicide
Farmers Suicide

By

Published : Sep 13, 2022, 5:27 PM IST

मुंबईकोरोनानंतर राज्यात अनेक उत्सवांना उधाण आले आहे. Farmers Suicide मुंबई, ठाणे आणि पुण्यात दहीहंडी जोरदार साजरी झाली, श्रावण महिन्यातील छोटे सण सर्वत्र साजरी करण्यात आले, तर गणेशोत्सवात संपूर्ण महाराष्ट्र बुडून गेला होता. मात्र या काळात नेहमीप्रमाणे विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. Most Cases In Vidarbha District अतिवृष्टी कोरडा दुष्काळ खते कीटकनाशकांसाठी येणारा जादाचा खर्च आणि शेतात पिकणाऱ्या उत्पादनाला मिळत नसलेला भाव, मुलांची शिक्षणे आणि लग्न या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मृत्यूला कवटाळण्याचे समोर आले आहे.

विदर्भात सर्वाधिक आत्महत्यागेल्या 7 महिन्यात विदर्भात 810 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. Farmers Suicide In Vidarbha त्यापैकी अमरावती विभागात 612 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर त्या पाठोपाठ नागपूर विभागात 198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

गतवर्षापेक्षा अधिक आत्महत्यागेल्या वर्षी अमरावती विभागात 1177 आणि नागपूर विभागात 380 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या 7 महिन्यातील आत्महत्यांचे प्रमाण हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. Farmers Suicide In Vidarbha तर यंदा अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 51 शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात आत्महत्या केल्या आहेत. एकीकडे राज्यात उत्साही वातावरण असताना, फक्त यवतमाळमध्ये 51 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

ऑगस्ट महिना सर्वाधिक मृत्यूदरवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होताना दिसतात. 2001 ते 2006 या कालावधीत ऑगस्ट महिन्यात 93 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. 2007 ते 2014 या कालावधीत 211 तर 2015- 2016 मध्ये 85 शेतकऱ्यांनी तर 2017- 18 मध्ये 45 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. 2019 मध्ये 38, 2020 मध्ये 44, आणि 2021 मध्ये 29 तर यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 51 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या 51 शेतकऱ्यांपैकी केवळ 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीसाठी पात्र ठरले आहे. 42 आत्महत्यांची प्रकरणे अद्यापही प्रलंबित असून 3 आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न समजून घ्यावे- वानखेडेशेतकऱ्यांना कर्ज माफ करून अथवा अनुदानाची खैरात करून त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याची गरज असून त्यांचे मूळ प्रश्न समजून घेतले गेले पाहिजेत, असे मत शेती अभ्यासक अशोकराव वानखडे यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनासाठी लागणारा लागवडीचा खर्च, पीक पद्धतीत करावयाची बदल, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, शेतमालाला भाव देणे, नगदी पिकांसाठी त्यांना मदत करणे, खताचा आणि बी बियाण्यांचा सहजपुरवठा कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत वानखडे यांनी व्यक्त केले आहे.

काय आहेत कारणे शेतकरी आत्महत्यांना अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. मात्र त्यापैकी महत्त्वाचे आहे, शेतीचे झालेलं नुकसान आणि नापीकी. यंदा जुलै महिन्यापासून विदर्भात आणि यवतमाळ जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळतो. या पावसामुळे सोयाबीन तूर मूग उडीद कापूस ही पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. आधीच हतबल झालेला शेतकरी या आघात आणि अधिकच हवालदील झाला. शेतकऱ्यांनी आधीच विविध कारणांसाठी काढलेली कर्जे यामुळे वाढू लागली. बी बियाणे आणि रासायनिक खतांसाठी शेतकऱ्याकडे पैसा उरला नाही, अशातच खाजगी सावकार आणि बँकांनी कर्ज नाकारल्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नाही.

मदतीची घोषणा केली पणयासंदर्भात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. तसेच उत्पादन खर्च प्रचंड वाढल्याने कर्ज काढुन पेरणी करावी लागली. पण झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पीक पाण्यात गेले, अशा परिस्थितीत सरकारकडून मदतीची अपेशा होती. सरकारने मदतीची घोषणा केली पण प्रत्यक्षात मदत काही अजून मिळाली नाही.

रविकांत तुपकरांचा सवालसरकार मात्र गणपती, दहीहंडी उत्सवात मग्न आहेत. शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की, आमच्या सरकारच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही, पण सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यामुळे ती घोषणा हवेत विरली. शेतकऱ्यांना वारेवर सोडून सत्ताधारी मात्र मुंबई वाचविण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांचे जगणं सरकार केव्हा मान्य करणात आहे..? असा सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details