महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कांदा निर्यात बंदी तातडीने हटवण्याची मागणी , केंद्रीय कृषीमंत्र्यांना पत्र

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी तातडीने हटवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

onion prices in india
कांदा निर्यात बंदी तातडीने हटवण्याची मागणी , केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र

By

Published : Sep 25, 2020, 8:10 AM IST

मुंबई -राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी तातडीने हटवण्याबाबत केंद्रीय कृषीमंत्री नरेद्रसिंग तोमर यांना पत्र पाठवले आहे.

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी तातडीने हटवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचे संकट ओढावल्यानंतर आता बाजार पूर्ववत होत होते. त्यातून कष्टाने पिकवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने अचानकपणे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे साठवलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असतांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे.

केंद्राने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी रोहयो व फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details