मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे लक्ष दररोज पत्रकार परिषद घेणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे लागले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात आज निराशा पडली असून कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षांचा देखील भंग झाल्याचा आरोप शेतकरी नेते माणिक कदम यांनी केला आहे. यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राच्या पॅकेजवर शेतकरी संघटनांची नाराजी; फसवणूक झाल्याचा शेतकरी नेत्यांच्या आरोप - farmer criticizes finance minister announcements
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे लक्ष दररोज पत्रकार परिषद घेणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे लागले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात आज निराशा पडली असून कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षांचा देखील भंग झाल्याचा आरोप शेतकरी नेते माणिक कदम यांनी केला आहे.
लहान मूल रडत असल्यावर पालक त्यापुढे खेळणं वाजवून मनोरंजन करतात. प्रत्यक्षात त्या मुलाला दुधाची भूक लागलेली असते त्यामुळेच ते रडत असतं. अशाच पद्धतीची आज सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांची वेदना आहे, असे कदम म्हणाले. अशा प्रकारे पॅकेजचा भुलभुलैय्या शेतकऱ्यांच्या कामाचा नाही, असेही कदम यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीची गरज असताना पीक विमा किंवा नियमित योजनांच्या निधीची घोषणा करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे सरकार मोठ्या उद्योगपतींचे असून त्यांना शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नसल्याचा आरोप माणिक कदम यांनी केला आहे.