मुंबई- कोरोना योद्ध्येच कोरोनाचे शिकार होत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत शेकडो तज्ज्ञ डॉक्टरांना गमवावे लागत आहे. यात आता आणखी एका तज्ज्ञ डॉक्टरची भर पडली आहे. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर अजित चिखलीकर यांचा शुक्रवारी (21 ऑगस्ट) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 71 वर्षांचे होते. डॉ. चिखलीकर हे आरोग्य क्षेत्रातील मोठे नाव होते.
मुंबईने आणखी एक तज्ज्ञ डॉक्टर गमावला, डॉ. अजित चिखलीकर यांचे कोरोनाने निधन
डॉ. चिखलीकर हे माहीममधील 'रहेजा हॉस्पिटल' आणि परळच्या 'वाडिया हॉस्पिटल' मध्ये कार्यरत होते. कोविड काळातही सेवा देत होते. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर 21 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे आरोग्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.
डॉ. चिखलीकर हे सध्या माहीममधील 'रहेजा हॉस्पिटल' आणि परळच्या 'वाडिया हॉस्पिटल' मध्ये कार्यरत होते. कोविड काळात ही सेवा देत होते. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर 21 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे आरोग्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.
डॉ. चिखलीकर हे अत्यंत हुशार आणि अभ्यासु डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. सुवर्ण पदक विजेते 'एम्.डी' होते. 'केइएम'मध्ये त्यांनी २५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सहाध्यायी आणि जगभर पसरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत लाडके होते. दरम्यान, केईएममधून निवृत्त झाल्यानंतर ते रहेजा-वाडीयात रुग्णसेवा देत होते.
आरोग्य आणि उपचार याविषयी मार्गदर्शन करणारे लेखन त्यांनी केले. त्यांच्या पश्चात दोन डॉक्टर कन्या आणि एक जावई डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.