महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया यांना मुंबई पोलिसांकडून अटक! - dilip Chhabriya arrested

छाबरिया यांची एक गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही कारवाई केली.

Famous Car designer and founder of DC cars Dilip Chhabriya arrested by mumbai crime branch
'डीसी कार्स'चे मालक दिलीप छाबरियांना मुंबई पोलिसांनी केली अटक!

By

Published : Dec 28, 2020, 11:55 PM IST

Updated : Dec 29, 2020, 4:36 PM IST

मुंबई :प्रसिद्ध कार डिझायनर, आणि डीसी कार्स कंपनीचे संस्थापक दिलीप छाबरिया यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केल्याचे समोर आले आहे. मुंबई न्यायालयाने छाबरिया यांना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसी भागातून दिलीप छाबरिया यांना अटक-

छाबरिया यांची एक गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही कारवाई केली. या यूनिटचे प्रमुख सचिन वाजे यांच्या पथकाने अंधेरीच्या एमआयडीसी भागातून दिलीप छाबरिया यांना अटक केली.

डीसी कार्स मालक अटक

अधिक तपास सुरू-

पोलिसांनी छाबरिया यांच्यावर आयपीसीच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 120 बी आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान, याबाबत अधिक तपास सुरू असून, आणखी काही लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आणखी काही लोकांना अटक करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात दिलीप छाबरीया यांची एक स्पोर्ट्स कार पार्क करण्यात आली आहे.

छाबरिया यांची आलिशान कार

2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी-

डीसी कार्स कंपनीचे संस्थापक दिलीप छाबरिया यांना न्यायालयात हजर केले असता. त्यांना मुंबई न्यायालयाने 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा-दिलीप छाबरिया अटक प्रकरण: मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद LIVE

Last Updated : Dec 29, 2020, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details