महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजकीय विरोध अन् कौटुंबिक सलोखा; कठीण काळात एकत्र असलेले राजकीय घराणे - राज ठाकरे उद्धव ठाकरे रुग्णालयात भेट

महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबात राजकीय वाद निर्माण झालेले पाहायला मिळतात. यामध्ये मुंडे (Munde Family) आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये (Thackeray Family) नेहमीच राजकीय वादाची चर्चा असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात राजकीय वैर आहे. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातही राजकीय वैर आहे. मात्र, कुटुंबाच्या कठीण परिस्थितीमध्ये हे घराणे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे.

file photo
फाईल फोटो

By

Published : Apr 14, 2022, 4:55 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राजकारणात सक्रिय असलेले अनेक कुटुंब पाहायला मिळतात. ज्यामध्ये राजकारणाचा वारसा खालील पिढ्या सांभाळत महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली छाप टाकताना दिसतात. मात्र, यासोबतच काही अशी राजकीय कुटुंबात राजकीय वाद निर्माण झालेले पाहायला मिळतात. यामध्ये मुंडे (Munde Family) आणि ठाकरे कुटुंबीयांची (Thackeray Family) नेहमीच असा राजकीय वादाची चर्चा होताना पाहायला मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे चुलत भाऊ राज ठाकरे (Raj Thackeray) हे आताही मुख्यमंत्री तसेच शिवसेनेवर जहरी टीका करतात. तर तिथेच पंकजा मुंडे आणि मग धनंजय मुंडे हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही राजकीय संधी सोडत नाहीत. असे असतानाही कुटुंबावर आलेल्या संकटांवेळी हे कुटुंब एकत्र झालेली उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहेत.

धनुभाऊंसाठी पंकजाताई रूग्णालयात धावल्या - पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेऊन आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. तरी सध्या हे दोन्ही नेत्यांचा एकमेकांवर टीका केल्याशिवाय एकही दिवस जात नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराजय करून धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला होता. त्या विजयानंतर दोन्ही नेते नात्याने चुलत भाऊ बहीण असूनही त्यांचे राजकीय वैर वाढतच जाताना दिसत होते. मात्र, 12 एप्रिल रोजी संध्याकाळी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना भोहळ आल्याने तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी धनंजय मुंडे यांना चार ते पाच दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

आपले चुलत बंधू धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा मुंडे रुग्णालयात पोहोचल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडे या देखील होत्या. अचानक पंकजा मुंडे यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी धनंजय मुंडे यांचे घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. या भेटीतून पंकजा मुंडे यांनी कौटुंबिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटले जातेय. या आधी हि पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना सार्वजनिक ठिकाणी धनुभाऊ म्हणून बोलताना पाहायला मिळाल आहे. सख्खे चुलत भाऊ-बहीण असतानाही दोघांचं राजकीय वैर नेहमीच पाहायला मिळते. मात्र आज संपूर्ण महाराष्ट्राने कुटुंबाच्या कठीण प्रसंगी भाऊ आणि बहिणीचे प्रेम पाहिलं.

राज ठाकरेंनी धरली उद्धव ठाकरे यांच्या गाडीची स्टेरिंग -2012 साली देखील राजकीय वर्तुळात असाच सुखद धक्का ठाकरे बंधूंनी देखील दिला होता. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचं तयार केलं होतं. या काळात शिवसेना पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. दोन्ही भावांमध्ये राजकीय वैर टोकाला पोहोचलं होतं. मात्र असे असतानाही त्या काळात उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी राज ठाकरे कामानिमित्त मुंबईच्या बाहेर होते. मात्र, उद्धव ठाकरे आजारी असल्याची बातमी मिळताच राज ठाकरे यांनी लगेच रुग्णालयाकडे धाव घेतली होती. रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गाडी चालवत मातोश्रीला घेऊन गेले होते. त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

अमित ठाकरेंच्या लग्नातही एकत्र - राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या लग्न सोहळ्यात देखील दोन्ही कुटुंबाचा सलोका पाहायला मिळाला होता. आजही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय स्पर्धा टोकाला पोहचलेली पाहायला मिळते. नुकतेच राज ठाकरेंनी घेतलेल्या दोन्ही सभेतून महाविकास आघाडी आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details