महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Actress Suicide Case Mumbai : दोन तोतया एनसीबी अधिकारी अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात - Nawab Malik Allegations

एनसीबीचे अधिकारी असल्याचे भासवत एका भोजपुरी अभिनेत्रीला खंडणी मागून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या ( Bhojpuri Actress Committed Suicide ) तोतया एनसीबी अधिकाऱ्यांना ( Fake NCB Officers Arrested ) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Accused
आरोपी

By

Published : Dec 26, 2021, 7:42 PM IST

Updated : Dec 27, 2021, 5:36 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तोतया अधिकारी बनून एका भोजपुरी अभिनेत्रीला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील आंबोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली ( Fake NCB Officers Arrested ) आहे. या दोन आरोपींच्या खंडणीच्या दबावाखाली अभिनेत्रीने २३ डिसेंबरला आत्महत्या ( Bhojpuri Actress Committed Suicide ) केली होती. सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे, असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तोतया अधिकारी अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात
माहिती देताना मंत्री नवाब मलिक

हेही वाचा -Anger of Matang community : मातंग समाजाचा विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आक्रोश

आरोपींनी २८ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीला एनसीबी अधिकारी म्हणून पार्टीत ( Fake NCB Raid Mumbai ) पकडले आणि या अभिनेत्रीकडे ४० लाखांची मागणी केली. नंतर २० लाखांत हे प्रकरण मिटले. अभिनेत्रीसोबत अझीम काझी आणि अन्य 1 तरुण होता. तिघेही एका हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत होते, जिथे हे दोघे आरोपी स्वतःला एनसीबीचे अधिकारी म्हणून सांगत तिथे पोहचले होते. आरोपींच्या दबावामुळे ही अभिनेत्री इतकी नैराश्यात गेली की, तिने 23 डिसेंबरच्या रात्री जोगेश्वरी येथील तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी पोलिसांनी भादंवि ३०७ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त करणे, भादंवि १०७ लोकसेवकाची तोतयागिरी करणे, ४२० प्रमाणे फसवणूक, ३८४, ३८८ आणि ३८९ प्रमाणे खंडणी, ५०६ प्रमाणे धमकी देणे, १२० ब प्रमाणे कटकारस्थान करणे, अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेत्री वास्तव्यास होती त्या इमरातीतील सिक्युरिटी गार्ड म्हणाला...

माहिती देताना सिक्युरिटी गार्ड

अभिनेत्री ज्या इमारतीत वास्तव्यास होती तेथील सिक्युरिटी गार्डने माहिती दिली की, अभिनेत्री ही सगळ्यांशी खेळीमेळीने वागत असे. अतिशय सामान्य आयुष्य जगत असे.

काय आहे प्रकरण?

23 डिसेंबरला एका अभिनेत्रीने ओशिवरा येथे राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या 28 वर्षीय अभिनेत्रीला दोन तोतया एनसीबी अधिकाऱ्यांनी एका पार्टीतून अटक केल्याचे भासवत 40 लाखांची मागणी केली होती. मात्र, हे सर्व प्रकरण दाबण्यासाठी अभिनेत्रीने वीस लाख रुपये देण्यासाठी तयारी दर्शवली. मात्र, त्यानंतर या दोन्ही तोतया एनसीबी अधिकाऱ्यांकडून त्या अभिनेत्रीला पैशासाठी सातत्याने त्रास दिला जात असल्याने त्या अभिनेत्रीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून 23 डिसेंबरला आत्महत्या केली होती.

नवाब मालिकांनीही केला होता आरोप

मुंबई एनसीबीकडून काही लोक बनावट अधिकारी बनून बॉलिवूडच्या कलाकारांना ( Fake NCB Officer Extortion Mumbai ) त्रास देतात. तसेच, खोट्या प्रकरणांमध्ये त्यांना अडकवण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. हा सर्व प्रकार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( NCB Zonal Director Sameer Wankhede ) यांच्या निर्देशातून सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक ( Nawab Malik Allegations ) यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे, आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा -एनसीबीच्या प्रायव्हेट आर्मीकडून होणाऱ्या वसुलीला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या, नवाब मलिकांचा आरोप

Last Updated : Dec 27, 2021, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details