महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत दहावी नापास डॉक्टरला बेड्या; बोगस प्रमाणपत्रांवर थाटले होते रुग्णालय - बोगस डॉक्टर बातम्या

पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून 5 बोगस डॉक्टरांना अटक केली. यामध्ये कुर्ला (प) येथील नवबहार क्लिनीकच्या दहावी नापास डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर डोंगरीचा शाही हुसेन हा फक्त आठवी पास झालेला डॉक्टर आहे.

fake doctors arrested in mumbai
कुर्ल्यातील दहावी नापास डॉक्टरला बेड्या;

By

Published : Dec 5, 2019, 7:40 AM IST

मुंबई - शहर व उपनगरांमध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असून गरीब व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाशी हे बोगस डॉक्टर खेळ करत आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये कारवाया करुन अशा बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पोलिसांनी बुधवारी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून 5 बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. यामध्ये कुर्ला (प) येथील नवबहार क्लिनीकच्या दहावी नापास डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरांकडे बोगस प्रमाणपत्र आढळले असून यातील काहीजण दहावी नापास आहेत.

शहरातील विविध भागांमध्ये बोगस डॉक्टर कार्यरत असल्याच्या तक्रारी आल्याने पोलिसांनी कुर्ला, डोंगरी, धारावी, अँटॉप हिल,आदी ठिकाणी छापे टाकून पाच बोगस डॉक्टरांना अटक केली. यामधील कुर्ला येथे नवबहार दवाखाना चालवणारा डॉक्टर चक्क दहावी नापास आहे. तर डोंगरीचा शाही हुसेन हा फक्त आठवी पास झालेला डॉक्टर आहे. तर काही ठिकाणचे डॉक्टर दुसऱ्यांच्या पदव्यांवर दवाखाना चालवत होते.

याआधी करण्यात आलेल्या कारवाईत एक डॉक्टर शाळेतही न गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details