महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अनिल देशमुख यांना आता नैतिकता सुचली का? - देवेंद्र फडणवीस

परमबीर सिंग यांनी जे काही आरोप केले आहेत. त्याबद्दल मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा अपेक्षित होता. हा राजीनामा द्यायला उशीर झालेला आहे. तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता. पण आज देशमुख यांना नैतिक जबाबदारी आठवलेली आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. पण ही नैतिकता पहिल्याच दिवशी त्यांना आठवायला हवी होती असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

fadnavis reaction to home minister anil deshmukhs resignation
fadnavis reaction to home minister anil deshmukhs resignation

By

Published : Apr 5, 2021, 5:20 PM IST

मुंबई -सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि आत्ता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात एवढ्या भयानक घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणावरती चकार शब्द काढत नाहीत, त्यांचे मौन अस्वस्थ करणारे आहे, अशी खोचक टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
परमबीर सिंग यांनी जे काही आरोप केले आहेत. त्याबद्दल मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा अपेक्षित होता. हा राजीनामा उशीर झालेला आहे. तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता. पण आज देशमुख यांना नैतिक जबाबदारी आठवलेली आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. पण ही नैतिकता पहिल्याच दिवशी त्यांना आठवायला हवी होती असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असला तरी एका गोष्टीचे मला कोडं आहे. अनेक भयानक गोष्टी राज्यात झाल्या आहेत. पण तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे आहे. सचिन वाझे काय लादेन आहे काय? हे त्यांची शेवटची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे त्यांनी आत्ता बोललं पाहिजे असा सणसणीत टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का - फडणवीस


आत्ता नैतिकता आठवले असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का असा प्रश्नच मुख्यमंत्र्यांना विचारावा लागेल? मी पुराव्यांच्या आधारे माझी भूमिका मांडत होतो. पण मला उत्तर देणारे टोलवाटोलवी करत होते. मला उत्तर देणारे माझेच चौकशी करू अशी वल्गना देत होते. पुराव्यांनिशी मी आज ज्या गोष्टी मांडत होतो त्या न्यायालयानेही स्वीकारल्याचे मला समाधान आहे. सचिन वाझेचे बॉस अजून सापडलेले नाहीत सचिन वाझेंचे हँडलर शोधणे महत्त्वाचे आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details