महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik Criticized BJP : दारूचे उत्पादन करणारे सर्वाधिक कारखाने भाजपच्या नेत्यांचे, परवाने रद्द करणार का? : नवाब मालिक - दारूचे उत्पादन करणारे कारखाने भाजपच्या नेत्यांचे

राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. भाजपचे नेते त्याला विरोध करत असताना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांवर सवाल उपस्थित केला ( BJP Opposes Wine At Supermarket ) आहे. दारू उत्पादन करणारे अनेक कारखाने भाजप नेत्यांचे आहेत. त्यांचे परवाने रद्द करणार का? अशी विचारणा त्यांनी केली ( Nawab Malik Criticized BJP ) आहे.

नवाब मालिक
नवाब मालिक

By

Published : Feb 2, 2022, 5:50 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाला भारतीय जनता पक्ष विरोध करत ( BJP Opposes Wine At Supermarket ) आहे. मात्र, दारू उत्पादन करणारे कारखाने मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आहेत. त्या कारखान्यांचे परवाने भाजपाचे नेते रद्द करतील का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला ( Nawab Malik Criticized BJP ) आहे.

दारूचे उत्पादन करणारे सर्वाधिक कारखाने भाजपच्या नेत्यांचे, परवाने रद्द करणार का? : नवाब मालिक

दारू विक्री दुकानांचे परवानेही भाजपच्या नेत्यांचे

शॉपिंग मॉल आणि स्टोअर्समधून वाईन विक्रीचा निर्णय राज्यसरकारने ( Wine At Supermarket ) घेतल्यानंतर त्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. मात्र राज्यात अधिकतर दारू उत्पादन करणारे कारखाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आहेत. तसेच दारू विक्री करणाऱ्या दुकानांचे परवानेही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आहेत. ते परवाने भारतीय जनता पक्षाचे नेते स्वतःहून रद्द करून घेतील का? असा सवाल राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाला केला आहे.

सर्वात जास्त दारू पिणारे नेते, कार्यकर्ते भाजपात

मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडी सरकारने वाइन विक्रीच्या संबंधात निर्णय घेतल्यानंतर त्याचा मोठा विरोध भारतीय जनता पक्ष करत आहे. मात्र महा विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेचं गोवा, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश सरकारने निर्णय आधी घेतला आहे. तसेच सर्वात जास्त दारू पिणारे नेते आणि कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षात असल्याचा टोलाही यावेळी नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details