मुंबई - दोन वर्षांच्या संघर्षानंतर कोरोना आता नियंत्रणात (Corona Control in Maharashtra) आला आहे. कोरोनाची आकडेवारी कमी झाली आहे. अलीकडेच थोडासा कोरोना आकडा वाढत असला तरी तो चिंताजनक नाही. मात्र, या संपूर्ण परिस्थितीमध्ये एक नाव कायमच चर्चेत राहिले ते म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope). कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन सातत्याने जीवाची पर्वा न करता ते फिरले हे सर्व राज्याने पाहिले. कोरोनाची आजची परिस्थिती काय आहे आणि यापुढे संपूर्ण नियोजन कसे असेल याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope Face to Face) यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुरेश ठमके यांनी.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ईटीव्ही भारतने घेतलेली मुलाखत प्रश्न - कोरोनाच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलं, आपण संपूर्ण परिस्थिती हाताळत होतात. सध्या काय परिस्थिती आहे?
राजेश टोपे - आता राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्याने आता सगळेच निर्बंध शिथिल केले आणि ते शिथिल करण्याचा निर्णय या चळवळीला ज्यावेळी आता निश्चित प्रकारे असं वाटतं की आपण ५० हजार केसेस जरी आपण तपासल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये फक्त पंचवीस, पन्नास, शंभरच्या आत मधेच पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट खूपच कमी झाला आहे. आजची परिस्थिती सुद्धा जर आपण म्हणून आता मुंबईमध्ये आहे एकूण राज्यांमध्ये आजची स्थिती वन थर्टी पॉईंट ५.६ झाला पण याचा अर्थ फार झाला अशातला भाग नाही सगळे नियंत्रणाखाली आहे आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे आपण त्यावर पूर्णता मात केलेली आहे. एवढीच काळजी घेत राहावे लागेल आणि नजर ठेवावी लागेल, लक्ष ठेवावे लागेल की काय संख्या आहे, त्या अनुषंगाने प्रकारे सध्या पूर्ण नियंत्रणात परिस्थिती आहे. काळजी करण्याचा कुठलाही विषय नक्कीच नाही.
प्रश्न - मास्कसंदर्भमध्ये आपण मास्क सक्ती उठवलेली आहे. साधारण लोकांनी काळजी घ्यावी का? मास्क वापरावेत का?
राजेश टोपे - मला असे वाटते जर लोक सहव्याधी वाले आहे, थोडे ओल्ड असेल तर या सगळ्या लोकांनी अधिक काळजी नेहमीच घेतली पाहिजे. तात्काळ वादाचा विषय नसतो कारण त्याची इम्युनिटी कमी असते किंवा कुठल्याही छोट्याशा इन्फेक्शन लगेच त्यांच्यामध्ये परिणाम होऊ शकतो असं जर वाटत असेल तर त्यांनी सगळ्यांनी काळजी घ्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे मला वाटतं की अगदी तरुण मुलांनी आणि त्यांनी जमेल तेवढे पद्धतीने काळजी घ्यायला हरकत नाही परंतु आता कंपल्शन असे अजिबात नाही.
प्रश्न - संभाव्य चौथी लाटेसंदर्भात काय तयारी?
राजेश टोपे - आपली फार मोठी तयारी आहे, बेड लाखोंमध्ये आपण तयार केलेली आहे व औषधाच्या संदर्भातील व्यवस्था आहे, ऑक्सिजन आहे. सर्व पद्धतीने आपण सगळ्या एडवर्ड्स कंडीशन कितीही झाले तरी त्या पद्धतीने आपण तयार निश्चित प्रकारे आहोत. परंतु ती एवढी कंडीशन आता येऊच नये एवढीच ईश्वराला प्रार्थनाही आणि त्या पद्धतीनं घडू नये असेच मी या निमित्ताने अपेक्षा करतो. परंतु महाराष्ट्र शासन आणि महा विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुर्णतः या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णता तयार आहोत.
प्रश्न - बारा ते चौदा वयोगटातील मुले आहेत त्यांच्यासाठी जे जे माहिती घेताना दिसत नाहीयेत प्रतिसाद अत्यल्प आणि बूस्टर डोस द्यायचा आहे तोही अल्प प्रमाणात लोक घेताना दिसतात.. बूस्टर डोस आवश्यक आहे का ?
राजेश टोपे - एक आहे की बारा ते पंधरा हा वयोगट असो किंवा पंधरा ते अठरा आणि अठराचे आणि वरच्या सगळ्याच वयोगटाला आता लसीकरण करून घ्यावे अशा पद्धतीच्या सूचना केंद्र सरकारच्या आहेत. आयसीएमआर, तज्ञांच्या आणि आम्ही या बाबतीतला पाठपुरावा करतो आमची मनापासून इच्छा आहे सगळं लसीकरण पूर्ण व्हावा. त्यांच्यामध्ये मोठ्या पद्धतीने व्हाव्यात आणि त्यांनी अतिशय सक्षम व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे त्यादृष्टीने त्यांनी सुद्धा सहकार्य करण्याची आवश्यकता आहे मी जे पाहिले आता १५ ते १८ वयोगटातील १२ ते १५ त्यांना नम्रपणे विनंती करेन की कुठल्याही परिस्थितीत त्यांनी घेतलेल्या नसेल, त्यांनी घेऊन ठेवाव जेणेकरून त्यांच्या पाल्यांना निश्चित प्रकारे खूप या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाचं पाऊल असू शकणार आहे.
प्रश्न -आरोग्य भरतीचा संदर्भामध्ये जर पाहिलं तर आरोग्य भरती आपण करतोय कारण अनेक पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे खूप आरोग्यदायी व स्थानाला अशा पद्धतीचे चित्र मधल्या काळात आपण पाहिलं?
राजेश टोपे - आरोग्य भरतीच्या बाबतीत आम्ही खूपच आग्रह पूर्वक की आरोग्य भरती व्हावी म्हणून मी आरोग्य मंत्री म्हणून खूप प्रयत्न केले परीक्षा घेतली आणि त्या परीक्षा झाल्या सुद्धा पण दुर्दैवाने अतिशय मला नमूद करावंसं वाटतं की त्यामध्ये जो काही पेपर लिखित झाला आणि आताची पोलीस केस तपास चालू आहे. त्यामुळे दोन-तीन रिपोर्ट आहेत, ते पोलिसांनी दिलेल्या वर्गाचा पेपर निश्चित प्रकारे व्हायरल झाला व्हायरल झाला याचा अर्थ लोकांपर्यंत गेला असेल याचा अंदाज लावू शकतो. म्हणून शंभर टक्के नवीन पूर्ण परीक्षाचा नवीन घेणार त्यात काय आता प्रश्न राहिलाच नाही. यासंदर्भात पेपर अद्यापही पोलीस डिपार्टमेंट मध्ये व्हायरल झालेला नाही म्हणजे तो कुठल्या कोणाच्या व्हाट्सअपवर आणि कुठे सोशल मीडियावर गेलेला नाही मात्र त्यातला काही भाग हा काही लोकांपर्यंत तर नक्कीच गेला हे तेवढेच सत्य आहे आणि म्हणून त्या सगळ्या संदर्भांनी आता आम्ही खर तर राज्याच्या प्रमुखाला विचारतो आणि जनरल त्या ठिकाणी मदत करतो किंवा आता यामुळे पूर्ण पेपर रद्दच करून घ्यावी परीक्षा का पोलिसांनी शोधले आहेत आणि त्या पर्यँत जाऊन त्यांना करून इतरांना कदाचित पेपरचा रिझल्ट लावा अशा स्वरूपाचा निर्णय घेण्याच्या आम्ही आमच्या मध्ये संभ्रम आहे पण लवकरच या आठवड्यातच कुठल्याही परिस्थितीत आणि त्या संदर्भातला निर्णय नक्की येऊ की पुन्हा पूर्ण परीक्षा घ्यायची क ची ? का त्यामध्ये काही विद्यार्थी आपल्या खऱ्या अर्थाने या संदर्भात निश्चित झाले की त्यांच्यापर्यंत पेपर पोहोचलेल्या तेवढे वगळून मग घ्यायची याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ.
प्रश्न - राज्यामध्ये जर आपण भोंगे लावण्याच्या संदर्भात,त्या धोरणाच्या संदर्भात, हनुमान चालीसा पठण करायचं तर एकूणच जे वातावरण आहे. ते आता राजकीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अशा पद्धतीचा निर्माण केले जाते का नेमकं यासंदर्भातलं जे आता सुरु आहे याकडे तर तुम्ही कसं पाहता?
राजेश टोपे - आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या सर्वांनीच आपल्याला या भोंग्याच्या संदर्भातली नियमावली करण्याच्या संदर्भात सांगितले ते योग्य आहे. त्यामुळे असं वाटण्याचं कारण नाही की कोणाला फेवर करतो आणि कोणाच्या विरोधात वातावरण तयार करत आहोत. कोणाला फेवर नाही करत एक नियम केला तर तो नियम सगळ्यांना निश्चित प्रकारे सारखा राहील आणि एक नक्की चे हे सांगत असताना आपण ध्रुवीकरण व्हावं हा कधीही विचार कोणत्याच महाराष्ट्राच्या व्यक्तीमध्ये असायला नको कारण त्यांनी राज्याचे नुकसान होईल जनतेचे नुकसान आणि माणसामाणसांमध्ये मोठी दरी निर्माण होईल. मला वाटते पुरोगामित्व असलेल्या महाराष्ट्राला नक्कीच अशोभनीय आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो आग्रहपूर्वक घेतो त्यांनी कधी आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की माणसाला जाती जातीच्या नावाने त्याच्यामध्ये भेदभाव करावा त्या छत्रपतींनी आणि छत्रपतींच्या विचाराचा अन्याय करणारे शाहु-फुले-आंबेडकर यांनी कधीही हा विचार दिलेला नाही त्यामुळे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्राला हा विचार नक्कीच या वादातून आपण माणसामाणसांमध्ये दरी निर्माण करणे उभा करणे नक्कीच योग्य नाही ते कुठे समर्थनीय नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पुढे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर अनेक प्रश्न बेरोजगारीचा आहे चांगल्या परिस्थितीच्या उत्पन्न वाढवून वाढीचे आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या विजेचा विषय असेल अनेक विषय आहेत गरिबीची आहे त्या सगळ्या गोष्टी सामूहिकपणे आपण सामोरे जाऊन खऱ्या अर्थाने काम करण्याची गरज विकासात्मक विषय असते तुम्हाला वाटतं की या सगळ्या महत्त्वाच्या विषयांमध्ये सर्वांनी एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याचे काम केले पाहिजे, अशा पद्धतीच्या काही करण्याचे काम नक्कीच नाही.
हेही वाचा -XE Variant in India : देशात एक्सई व्हेरीयंटचा आढळला एक रुग्ण - राजेश टोपे