मुंबई -मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेचे राज्य आहे. शिवसेनेने मुंबईकरांना वेठीस धरले असून, भ्रष्ट कारभाराची एकाधिकारशाही येत्या निवडणुकीत संपवणार, असा दावा भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार mumbai bjp chief Ashish Shelar यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा मुंबईत खांदेपालक केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देत पुन्हा एकदा निवडणुकांचे मैदान गाजवण्यासाठी आशिष शेलार यांच्यावर मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली Ashish Shelar criticized thackeray over mumbai corporation election 2022 आहे.
'मुंबईतील एका परिवाराची मक्तेदारी संपवणार' -आशिष म्हणाले की, मुंबईत गेल्या पंचवीस वर्षांपासून महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ठाकरे परिवारांची ही मक्तेदारी येत्या निवडणुकीत मोडून काढणार आणि मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार, असा ठाम विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.
'मराठी माणसाच्या नावाने राजकारण' - शिवसेनेने आतापर्यंत मुंबईत मराठी माणसाच्या नावाने केवळ राजकारण केलं. शिवसेनेलाच मुंबईत मराठी माणसाचा पाठिंबा मिळतो, हा भ्रम तयार केला आहे. मात्र, हा भ्रम यावेळेस निश्चितच दूर होईल आणि मराठी माणूस हा अन्य पक्षांनाही तितक्याच मोठ्या प्रमाणात मतदान करतो. विशेषता यावेळेस तो भाजपवर विश्वास दाखवेल. शिवसेनेने मुंबईकरांची फसवणूक केली आहे. केवळ नावाला मराठी माणूस म्हटले जाते. पण, मुंबईतील सर्व कंत्राटदार हे अमराठी आहेत. मुंबईत केवळ भ्रष्टाचाराची गंगोत्री निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. मुंबईतली रस्ते आणि पाणी व्यवस्था या सर्व अतिशय खराब अवस्थेत आहे. मुंबईकरांना विकासाची नवी वाट भाजप दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही आशिष शेलारांनी सांगितलं आहे.