महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गँगस्टर एजाज लकडावालासह 3 जणांवर साडेसात कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल - पायधुनी पोलीस मुंबई

गँगस्टर एजाज लकडावाला याच्यासह त्याला खंडणीसाठी मदत करणारे त्याचे खास हस्तक सलीम महाराज व तारिक परवीन यांच्याविरोधात मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला तब्बल साडे सात कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकवल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

gangstar ejaz lakdawala
गँगस्टर एजाज लकडावालासह 3 जणांवर साडेसात कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

By

Published : Feb 26, 2020, 8:12 PM IST

मुंबई- गँगस्टर एजाज लकडावाला याच्यासह तीन जणांवर साडे सात कोटींची खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गँगस्टर एजाज लकडावाला याच्यासह त्याला खंडणीसाठी मदत करणारे त्याचे खास हस्तक सलीम महाराज व तारिक परवीन यांच्याविरोधात मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला तब्बल साडे सात कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकवल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता धमकवलेल्या पीडितांकडून आता पोलिसांकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.

`

कोण आहे एजाज लकडावाला

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने एजाज लकडावाला याला पाटणा येथून अटक केली होती. काही दिवसांपूर्वी एजाज याची मुलगी शिफा शेख उर्फ सानिया लकडावाला हिला मुंबईतील एका बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या पोलीस चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी एजाज याचा शोध घेत त्याला बिहारमधील पाटणा येथून अटक केली होती. 1992 मध्ये छोटा राजन याने दाऊद इब्राहिम याच्यासोबत फारकत घेतल्यानंतर एजाज लकडावाला हा छोटा राजनसोबत काम करू लागला. 1992 ते 2008 या दरम्यान एजाज लकडावाला याने मुंबईतील विविध व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या. खून, खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी धमकावणे, यासारखे गंभीर 25 गुन्हे एजाज लकडावाला याच्या नावावर आहेत. याबरोबरच त्याच्या विरोधात 80 तक्रार अर्जसुद्धा दाखल झालेले आहेत. 2008 मध्ये बँकॉकमध्ये असताना एजाज लकडावाला याच्यावर छोटा शकीलच्या हस्तकांनी गोळीबार केला होता. ज्यामध्ये एजाज लकडावाला याला सात गोळ्या लागूनसुद्धा तो वाचला होता. छोटा राजनसोबत आर्थिक मतभेद झाल्यानंतर त्याने स्वतःची टोळी बनवली होती. लकडावाला याचे वास्तव्य अमेरिका, इंडोनेशिया, बँकॉक, मलेशिया सारख्या देशात होते. यादरम्यान त्याने या देशांमध्ये स्वतःची करोडो रुपयांची संपत्तीसुद्धा बनवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details