मुंबई - मुंबईतील धोकादायक इमारतीतील ( Dangerous Buildings in Mumbai ) काही रहिवाशांना सूचना देऊनही अद्याप इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. अशा इमारतीत वास्तव्य करणे धोकादायक असल्याने या इमारती तात्काळ रिकाम्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने अशा इमारतींची यादी निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. ( Dangerous Buildings will be emptied in Mumbai )
अतिधोकादायक इमारती खाली करणार -मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची पावसाळ्या दरम्यानची विशेष समन्वय बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत मुंबईतील अतिधोकादायक इमारती तसेच डोंगर उतारावरील झोपड्यांबाबत आढावा घेण्यात आला. जोरदार पावसात मुंबईतील इमारती त्यांचे भाग कोसळण्याच्या घटना घडत असून त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या. अतिधोकादायक इमारतीतील रहिवासी सूचना देऊनही इमारती रिकाम्या करीत नाहीत. त्यामुळे अशा इमारती पोलिसांच्या मदतीने रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ( Extremely dangerous buildings will be emptied )