मुंबई: पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत कुणकुण लागताच पतीने प्रियकराला एका खोलीत बोलावून लाथाबुक्क्यांसह लाकडी बांबू, पट्याने बेदम मारहाण केली Beaten badly आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रियकर तरुणाचा आठवड्याभराच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी Bhandup Police तिघांविरोधात गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे.
विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंधभांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर भुडकु पटाईत (५५ ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. २६ सप्टेंबरला सूरजला मारहाण झाल्याचे समजले. सुरजचा काही इसमांसोबत वाद झाला होता. उपचाराकरीता त्याला मुलुंड जनरल रुग्णालय येथे दाखल केले असून त्याची तब्येत सुधारत होती. त्याच्या भावाला याबाबत कळवताच त्याने सूरजची भेट घेतली. सुरजकडे केलेल्या चौकशीत त्यांचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत तिचा पती अविनाश तोरणेला कळाल्यानंतर त्याने प्रतापनगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याच्यासह अश्विन तोरणे व रुपेश भिसे यांनी लाकडी बांबू, चामडयाचा पट्टा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नसल्याची माहिती दिली.