महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून सीएसटी ते पंढरपूर ३४ जादा गाड्या

रेल्वेच्या जादा फेऱ्या सहा नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार, अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मध्य रेल्वे

By

Published : Nov 6, 2019, 3:58 PM IST

मुंबई- कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी रेल्वेने यंदा अधिक गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठ्ठल माऊलींच्या दर्शनासाठीचा प्रवास हा सुखकर होणार आहे.

शिवाजी सुतार - मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे मुंबई

हेही वाचा -अमित शाहंसारख्या तज्ज्ञांचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक - शरद पवार

कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी आजपासून(बुधवार) शिवाजी महाराज टर्मिनस ते पंढरपूर जादा रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. या गाड्या सीएसएमटी ते पंढरपूर ते मिरज धावणार आहेत.

रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे मार्गस्थ होतील -
पंढरपूर-मिरज-पंढरपूर, पुणे-पंढरपूर-पुणे, लातूर-पंढरपूर - लातूर
रेल्वेच्या जादा फेऱ्या सहा नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार, अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details