मुंबई : अलीकडे सोशल मीडियावरून ( Social media ) अश्लील व्हिडीओ ( Porn videos ) तयार करून अथवा फोटो मॉर्फिंग ( Photo morphing ) करून खंडणी उकळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असाच एक प्रकार अंधेरी परिसरात घडला आहे. बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीच्या संचालकाची तंत्रज्ञानाच्या मदतीने अश्लील व्हिडीओ तयार करून संचालकाकडे खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघकीस आली आहे. आरोपीने संचालकांच्या नावाने सोशल मीडियावर दोन बनावट प्रोफाईल तयार करून त्यांचे काका, इतर मित्रांना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून बदनामी केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंस्टाग्रामवर झाली होती ओळख२६ वर्षीय तक्रारदार प्रसिद्ध बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट ( Instagram ) आहे. त्यांना रविवारी इन्स्टाग्रामवर एका महिलेची फ्रेंडशिप रिक्वेस्ट आली होती. ती रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारल्यानंतर सोमवारी महिलेने मला ओळखले का? असे तक्रारदाराला विचारले. त्यानंतर संचालक, अज्ञात महिलेचे इन्स्टाग्रामवर चॅट सुरु झाले. महिलेने संचालकाला व्हिडिओ कॉल करू का, अशी विचारणा केली. त्यावर संचालकाने होकार दिल्यानंतर महिलेने त्याला व्हिडिओ कॉल केला.
व्हिडीओ कॉलवरून महिलेने केले अश्लील चाळे व्हिडीओ कॉलवरून महिला अश्लील चाळे ( obscene chale ) करीत होती. तक्रारदारांनी दूरध्वनी ठेवला असता महिलेने तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांची चित्रफीत तयार करून त्यास पाठवली. त्याचप्रमाणे ७० हजार रुपये खंडणीची मागणी केली. ती रक्कम न दिल्यास बदनामी करण्याची धमकी तिने त्यास दिली. तक्रारदाराने आरोपी महिलेला खंडणीची रक्कम दिली नाही.