महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पेंग्विनच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ, विरोध होण्याची शक्यता - पेंग्विनच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ

भायखळा राणी बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी मे. हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही मुदत मुदत 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे. नव्या कंत्राटदारासाठी तीन वेळा टेंडर काढूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने पालिकेने जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे. पेंग्विनवर गेल्या 3 वर्षांत 11 कोटी 46 लाख रुपये खर्च झाले असून आता आणखी 45.84 लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत विरोध होण्याची शक्यता आहे.

पेंग्विन
पेंग्विन

By

Published : Nov 15, 2021, 9:43 PM IST

मुंबई- भायखळा राणी बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी मे. हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही मुदत मुदत 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे. नव्या कंत्राटदारासाठी तीन वेळा टेंडर काढूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने पालिकेने जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे. पेंग्विनवर गेल्या 3 वर्षांत 11 कोटी 46 लाख रुपये खर्च झाले असून आता आणखी 45.84 लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत विरोध होण्याची शक्यता आहे.

जुन्याच कंत्राटदाराला काम -

बच्चे कंपनीचे विरंगुळ्याचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबागेत 2017 मध्ये परदेशी हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी 18 मार्च, 2017 ला अद्यावत पेंग्विन कक्ष सुरू करण्यात आला. पेंग्विनची व कक्षाची विशेष देखभाल करण्यासाठी पालिकेने मे. हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला 3 वर्षांसाठी 11.46 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. त्याची मुदत 30 सप्टेंबर, 2021 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे पुढे कंत्राटदार नेमण्यासाठी पालिकेने तीन वेळा टेंडर काढले. तिन्ही वेळा एक ते दोन कंत्राटदारांनीच प्रतिसाद दिला. त्यातच जुनाच कंत्राटदार कंत्राट मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याने नवा कंत्राटदार नियुक्त करण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी पालिकेने नवीन कंत्राट करार होईपर्यंत जुन्याच कंत्राटदाराला पुढील 43 दिवसासाठी कंत्राटकाम दिले. त्यासाठी त्याला 45 लाख 84 हजार रुपयांचा मोबदला दिला आहे. यामुळे पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी जुन्याच कंत्राटदाराला कंत्राट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विरोध होण्याची शक्यता -

पेंग्विनच्या देखभालीबाबतचे कंत्राट जुन्याच कंत्राटदाराला वाढवून देण्यात आले आहे. याआधीही पेंग्विनवर होणारा खर्च कमी करावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. यामुळे हा प्रस्ताव स्थायी समितीच्या येत्या बैठकीत मंजुरीसाठी आल्यास त्याला विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा -ST Employees Strike : आज सहा हजाराहून अधिक एसटी कर्मचारी कामावर हजर, १ ३१७ प्रवाशांचा लालपूरीतून प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details