महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सीईटी परीक्षा अर्ज नोंदणीसाठी मुदत वाढ द्या; एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीची मागणी

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी होऊ घातलेल्या सीईटी नोंदणी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हे तांत्रिक अडथळे त्वरित दूर करून अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 27, 2021, 7:45 PM IST

Updated : Jul 27, 2021, 8:18 PM IST

मुंबई -दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी होऊ घातलेल्या सीईटी नोंदणी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हे तांत्रिक अडथळे त्वरित दूर करून अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा -बलात्काराचा प्रयत्न केल्याचा 'केआरके'वर मॉडेलचा आरोप, एफआयआर दाखल

अडथळे त्वरित दूर करा -

नुकतेच इयत्ता दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर पुढील प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवार, २० जुलैपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली होती. परंतु, दुसऱ्याच दिवशी संकेतस्थळ बंद पडले. तत्पूर्वी अर्ज कसे भरले जावे, याबाबत शिक्षकांना कसलेच प्रशिक्षण दिले गेले नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांना अर्ज करताना येणाऱ्या अडचणी शिक्षक दूर करू शकत नाही. म्हणून विद्यार्थी - पालकांसमोर बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सुरू झाले. यादरम्यान देखील असंख्य अडथळे विद्यार्थी, पालकांना आले. शिक्षकसुद्धा त्यातून सुटले नाहीत. याची वास्तविकता सीईटी अर्ज मागविताना सरकारला समजली असेल. राज्यात अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नसणे, मोबाईल फोन व इतर उपकरणे उपलब्ध नसणे या अनेक समस्या आहेत. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी होऊ घातलेल्या सीईटी नोंदणीतील अडथळे त्वरित दूर करून अर्ज करण्यासाठी मुदत वाढ द्या, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीने केली आहे.

राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा -

मागील अनेक वर्षांपासून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने वेळोवेळी मागणी करून शैक्षणिक मागण्या लावून धरल्या आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, त्यासोबत इतर मुलभूत सोयी-सुविधा देण्याची मागणी सातत्याने केली आहे. म्हणून सध्या सीईटी अर्ज नोंदणी प्रक्रियेत येणारे अडथळे त्वरित दूर करण्यात यावेत. अर्ज नोंदणी पुन्हा त्वरित सुरू झाली पाहिजे. अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी. तसेच, ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जावे. दहावी पास झालेले सर्व विद्यार्थी पुढील प्रवेशापासून वंचित राहू नये, याची काळजी सरकारने घ्यावी, अशा मागण्या एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी केल्या आहेत. त्याचबरोबर, या मागण्यांचा त्वरित विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा एसएफआयच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एसएफआयच्या वतीने देण्यात आला.

हेही वाचा -वेटिंगवर असणारी लोकं, वेटिंगवरच राहणार - शरद पवार

Last Updated : Jul 27, 2021, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details