मुंबई -मुख्यमंत्री एकनाथशिंदे ( CM Eknath Shinde ) गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar ) यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) हाकलपट्टी केली. दुसऱ्या दिवशी बांगर यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहाबाहेर समर्थकांसह शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगरच जिल्हाप्रमुख असल्याचे यावेळी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी काढल्यानंतर शिंदे यांनी पुनर्वसन केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. बंडखोर आमदार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
बंडखोर आमदारांनाशिव्यांची लाखोली वाहणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख पदावरुन हटवले. बांगर यांनी त्यामुळे मुंबईत आज शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शक्तीप्रदर्शनात सहभागी होत, कार्यकर्त्यांना संबोधित केले. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही आमदार म्हणून विधानसभेत पाठवल्याबद्दल तुमचे अभिनंदन आहे. संतोष बांगर नेहमी सुख आणि दुखात धावून जातात. गेल्या महिन्याभरातील घडामोडी, प्रवासाबाबत मला अभिमान वाटतो. तसेच एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांची दखल फक्त राज्य, देश नाही तर जगभराने घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तूच जिल्हाप्रमुख -मविआचे सरकार असताना अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढील निवडणुकीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. हिंदुत्व, सावरकर, किंवा दाऊदचा विषय असो आपल्याला उघडपणे बोलता येत नव्हते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला. बाळासाहेबांनी अन्यायाला वाचा फोडा सांगितले होते. त्यामुळे हा उठाव केला आहे. तो बंड नसून अन्यायाविरोधातील उठाव आहे. ही भूमिका साधी नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच संतोष बांगर यांना तूच जिल्हाप्रमुख म्हणून तू कायम आहेस. इतकी ताकद मागे असताना इतर दुसरे कोण तिथे काम करु शकते, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
सरकार सर्वांगीण विकासासाठी -लोकांच्या मनातील, सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे राज्यात सरकार आहे. बाळासाहेबांच्या, धर्मवीर आनंद दिघेंच्या स्वप्नातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. महाराष्ट्रातील सर्वांनी आमच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. आषाढीला पंढरपूरला गेलो तेव्हा लोकांनी जे प्रेम दिले, स्वागत केले ते विसरु शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.तसेच मी एकटा नाही, तर तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री असल्याचे विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. हे सरकार सर्वांना न्याय देण्यासाठी आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. मी केवळ मुख्यमंत्री नसून राज्याचा सेवक आहे. आपण मिळून या संधीचं सोने करु या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.