मुंबई - रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या ( Woman Railway Traveler ) गालावरचा मुका घेणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले ( Punishment For Kissing Cheeks ) आहे. तब्बल सात वर्षांनी आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली ( Accused sentenced after 7 years ) आहे. आरोपीचे नाव किरण सुझा होनावर असून, तो गोव्यातील पणजी येथील निवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण -सीएसएमटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट २०१५ रोजी एक महिला प्रवासी आपल्या मित्रांसोबत हार्बर मार्गावरील गोवंडी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशन असा प्रवास करत होती. लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १ वर आली असता, किरण सुझा होनावर, या वय ३७ वर्ष इसमाने त्या महिला प्रवासीच्या उजव्या गालाचा मुका घेवून लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केला होता. त्यानंतर, पीडित महिलेने याबाबत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात रीतिसर तक्रार दाखल केली होती. लोहमार्ग पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात कलम ३५४, ३५४(अ) (१) भा.दं.वि. मधील गुन्हा नोंदविला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक गणपत गोंदके यांनी सदर आरोपीस अटक करुन पुढील तपास सुरु केला. तपासादरम्यान त्यांनी अटक आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त साक्षीदार तसेच सबळ पुरावे संकलित करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.