महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Exclusive Interview with Kishori Pednekar : वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब - किशोरी पेडणेकर

सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या (Increasing Corona Patients in maharashtra) वाढत आहे. यानिमित्ताने मुंबईतील लसीकरणाची स्थिती, महापालिकेने केलेल्या उपाययोजना या सर्व महत्वाच्या मुद्दयांवर 'ईटीव्ही भारत'ने महापौरांशी विशेष संवाद साधला.

Kishori Pednekar
Kishori Pednekar

By

Published : Jan 16, 2022, 10:10 AM IST

प्रश्न - मुंबईत कोरोना परिस्थिती कशी आहे ?
उत्तर -गेल्या तीन दिवसात दोन हजार रुग्ण संख्या कमी झाले आहेत. ओमायक्रॉन डेल्टा रुग्ण कमी आहेत. ओमायक्रॉन 307 डेल्टा 37 रुग्ण संख्या आहे. रुग्ण संख्या वाढते ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून न जाता नीट उपयोजना केल्या की, त्या संकटाला आपण कमी करू शकतो. आता जे रुग्ण सापडतात ते सौम्य लक्षणाचे रुग्ण सापडत आहेत. जास्त लक्षण असलेली रुग्ण 871 आहेत. ऑक्सीजन आजही तीनशे टनापर्यंत लागत आहे. टोलनाक्यावर ऑक्सीजन लागल्यास चिंतेची बाब आहे. गेल्या तीन दिवसात मुंबईकरांनी दिलेल्या साथीमुळे अडीच ते तीन हजार रुग्ण कमी झाले. मुंबईत कोरोना रुग्ण कमी व्हावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी नियोजन केले.

किशोरी पेडणेकर स्पेशल मुलाखत
प्रश्न - कुरिअर सेंटरची परिस्थिती काय आहे ?
उत्तर -बीकेसीमध्ये सध्या अडीच हजार रुग्ण संख्या असलेला सेंटर आहे. व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड, डायलिसिस बेड, महिला कक्ष या सर्वांवर वैयक्तिकपणे मी लक्ष ठेवत आहे. तिथे जाऊन सर्व वयोगटातील रुग्णांशी चर्चा केली, तर तिकडच्या परिस्थितीचा आढावा सातत्याने घेतला जात आहे. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, विरोधकांच्या भूलथापांना काही नागरिक बळी पडत आहेत. मात्र, असे केवळ दहा टक्केच मुंबईकर आहेत.

प्रश्न - महापौर म्हणून वर्दळीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही लोकांना आव्हान करता, लोकांचा प्रतिसाद कसा आहे ?
उत्तर -जे लोक मास्क लावत नाहीत ते राजकीय नेत्यांची उदाहरणे देतात. मात्र सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे.

प्रश्न - मुंबई लसीकरणाची परिस्थिती काय ?
उत्तर -15 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. पहिला डोस एक कोटी 22 लाख 990 लोकांनी घेतला आहे. दुसरा डोस 84 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी घेतला. 85 टक्के लोकांनी लसीकरण उद्यापर्यंत झालेला आहे. तसेच गोष्ट रोज 66 हजार 212 लोकांना आतापर्यंत देण्यात आला आहे. जिथे नागरिक लसीकरणासाठी येत नाहीत तिथे लोकांच्या घरी जाऊन लसीकरण दिले जात. तसंच जे वृद्ध लसीकरणासाठी येऊ शकत नाहीत अशा वृद्धांना शोधून प्रशासनाकडून लसीकरण केले जात आहे. मात्र, जे लोक काही कारणास्तव लसीकरण करत नाही त्यांना जबरदस्तीने प्रशासन लसीकरण करेल.

प्रश्न - दोन वर्षात महापौर म्हणून कोरोनाचे प्रश्न कसे सोडवेल ?
उत्तर -महापौर झाल्यापासून प्रभाग समितीनिहाय बैठका सुरू केल्या होत्या. मूलभूत प्रश्न नागरिकांचे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौर झाल्यानंतरच अडीच ते तीन महिन्यानंतर करोला सुरू झाला. मात्र या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सूचने नुसार काम केले. कोविड काळात अनेक ठिकाणी फिरुन काम केले. यावेळी मला स्वतःला कोरोना झाला. मात्र, त्या परिस्थिती ही लोकांची सेवा केली.

प्रश्न - विरोधकांकडून सातत्याने शिवसेनेवर आरोप केले जात आहेत ?
उत्तर -शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नेते आठवड्यानुसार आरोप करत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले आहे की प्रश्न विचारायला आरोप लागत नाही. गेली पंचवीस वर्ष ते आमच्यासोबत होते त्यावेळेस त्यांच्या बुद्धीला गंज चढला होता का ? मुंबईकर आता त्यांनाच प्रश्न विचारत आहेत. वीस बावीस वर्ष आमच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा का विरोधक बोलले नाही. ते सत्तेशिवाय राहू शकत नाही म्हणून त्यांचा जीव तळमळतोय. त्या उद्वेगापोटी शिवसेनेवर आरोप केले जात आहेत.

प्रश्न - शिवसेना निवडणुकीसाठी तयार आहे का ?
उत्तर -निवडणुका समोर ठेवून शिवसेना काम करत नाही. मात्र, आमच्या प्रत्येक वॉर्डमधील नगरसेवकांनी काम केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई वर लक्ष ठेवून काम करून घेतली आहेत. मुंबई शिवसेनेने क्वॉलिटी वर्क केला आहे. मुंबईकरांसोबत आणि मोठ्या प्राण्यासाठी देखील काम करत आहोत. नुकताच आम्ही मुख्य प्राण्यासाठी विद्युत देहवाहिनी तयार केली आहे. ठाकरे कुटुंबीय आहे मुक्या प्राण्यांवर, कलेवर प्रेम करणारं कुटुंब आहे.

प्रश्न - महापालिकेवर भगवा फडकणार का ?
उत्तर -मुंबईवर शंभर टक्के पुढच्या विषयी भगवाच फडकणार. मुख्यमंत्र्यांवर डॉक्टरकडून उपचार सुरू आहेत. मात्र, ते अजूनही काम करत आहेत. पण विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणताही प्रकल्पाचे काम थांबू दिले नाही. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत आणि हेच विरोधकांच्या पोटात दुखत आहे. म्हणूनच प्रश्न विचारला अक्कल लागत नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे आणि वेळोवेळी विरोधक ते सिद्धही करून दाखवत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details