महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्रातील नेत्यांना राजकीय संस्कृतीचा विसर.. एकमेकांविरोधात सोशल माध्यमात आक्षेपार्ह्य पोस्टचा भडिमार

महाराष्ट्र हे राजकीय संस्कृतीचे राज्य म्हणून ओळखले जाते, मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यातील नेत्यांना त्याचा विसर पडलेला दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात आक्षेपार्ह्य पोस्ट करत आहेत. या पोस्ट करताना या नेत्यांना सोयीस्करपणे राजकीय संस्कृतीचा विसर पडलेला पाहायला मिळत आहे. अनेक नेते एकमेकांवर व्यक्तीगत पातळीवर टीका करत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून (Excitement in Maharashtra politics) निघाले आहे.

offensive-posts-on-social-media
offensive-posts-on-social-media

By

Published : Jan 7, 2022, 4:21 PM IST

मुंबई -महाराष्ट्र हे राजकीय संस्कृतीचे राज्य म्हणून ओळखले जाते, मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यातील नेत्यांना त्याचा विसर पडलेला दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात आक्षेपार्ह्य पोस्ट (Offensive posts on social media) करत आहेत. या पोस्ट करताना या नेत्यांना सोयीस्करपणे राजकीय संस्कृतीचा विसर पडलेला ( Leaders forget Maharashtra political culture) पाहायला मिळत आहे. नुकतंच भाजपचे मीडिया सेलचे प्रभारी जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य पोस्ट केली. त्या पोस्टनंतर राज्याचे राजकीय वातावरण तापलेले (Excitement in Maharashtra politics) पाहायला मिळाले. याआधीही दोन्हीकडच्या नेत्यांकडून अशा प्रकारच्या पोस्ट सातत्याने केल्या गेल्या आहेत.


सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर राजकीय नेते जहरी टीका करताना वेळोवेळी (Offensive posts on social media) करताना दिसत आहेत. महाराष्ट्र नेहमीच राजकीय सु-संस्कृतीसाठी ओळखले जाणारे राज्य आहे. मात्र असं असलं तरी, सध्या त्या राजकीय संस्कृतीचा सर्वच पक्षातील नेत्यांना विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वेळा राजकीय नेते सामाजिक भान विसरून एकमेकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिखलफेक करत आहेत.

रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह ट्विट -

नुकतेच भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Objectionable tweet against Rashmi Thackeray) यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह्य टीका केलेली पाहायला मिळाली. या टीकेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून जितेन गजरिया यांनी केलेल्या पोस्टनंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. मात्र या प्रकरणानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्यांकडून एकमेकांवर होणाऱ्या आक्षेपार्ह्य टीका करणे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

भाजपने रश्मी ठाकरे यांच्याविरोधात केलेली पोस्ट
कोणी केली कोणा विरोधात पोस्ट ?
याआधीही अनेक नेत्यांकडून अशा प्रकारच्या आक्षेपार्ह्य पोस्ट (Offensive posts on social media) केल्या गेल्या आहेत. ज्या पोस्ट मुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले. हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी विधान भवन परिसरामध्ये "म्याव म्याव" असं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही आघाडी सरकारचे नेते तसेच भाजपच्या नेत्यांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांविरोधात पोस्ट करण्यात आल्या. यामध्ये राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नितेश राणे यांच्या बाबत आक्षेपार्ह्य (Post of Nawab Malik against Nilesh Rane ) पोस्ट केली होती. कोंबड्याच्या चित्राला मांजराचा तोंड लावून "पहचान कौन?" असं ट्विट करत नितेश राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांनी केला होता.
नवाब मलिकांनी ही पोस्ट करून निलेश राणे यांना डिवचले.

हे ही वाचा -Amruta Fadnavis Vs Vidya Chavan : विद्या चव्हाण म्हणाल्या 'डान्सिंग डॉल', अमृता फडणवीसांनी ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

नवाब मलिक यांच्या या पोस्ट नंतर लगेचच नितेश राणे (Post of Nilesh Rane against Nawab Malik) यांच्याकडून देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाब मलिक यांना उत्तर देण्यात आलं. भंगाराच्या दुकानात बसलेल्या डुकराचा फोटो नितेश राणे यांच्याकडून ट्विट करण्यात आला. "ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण"? असा मजकूर त्यांच्याकडून ट्विट करण्यात आला. दोन्हीकडून करण्यात आलेल्या या पोस्टमुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं.

निलेश राणे यांनी नवाब मलिकांविरोधात केलेली पोस्ट
संजय राऊत यांची खिल्ली उडवणारी पोस्ट -
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधकांच्या एका कार्यक्रमांमध्ये शरद पवार पोहोचले असता त्यांना खुर्ची देण्यासाठी पुढे सरसावलेले खासदार संजय राऊत यांचा फोटो भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून पोस्ट करण्यात आला होता. तसेच या फोटोसोबत संजय राऊत यांच्या बाबत खोचक वक्तव्यही अतुल भातखळकर यांनी केले होते. अतुल भातखळकर यांनी केलेल्या या पोस्टनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आक्षेपार्ह्य शब्दांचा वापर करत टीका केली होती. या दोन्हीकडच्या टीकेनंतर देखील राजकीय वातावरण हे तापलेले पाहायला मिळालं होतं.
भाजपचे अतूल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात केलेली पोस्ट
निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांबाबत खोचक पोस्ट -
प्रकृती अत्यवस्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेले काही दिवस मंत्रालय तसेच कार्यालयांमध्ये अनुपस्थित होते. तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहू शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजत असताना, भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांच्याकडून गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला. कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असताना देखील मनोहर पर्रीकर यांनी आपलं कर्तव्य शेवटच्या क्षणापर्यंत बजावलं. मात्र राज्याचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी खोचक टीका आपल्या पोस्टच्या माध्यमातून निलेश राणे यांनी केली होती. त्यांच्या या खोचक पोस्टनंतर महाविकास आघाडी सरकारचे नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.
निलेश राणे यांनी केलेली पोस्ट
मालिकांच्या पोस्ट नंतर अमृता फडणीसांची नोटीस -
तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात नदी संवर्धनाच्या कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आलेला गाण्यांमध्ये ड्रग्स माफियाचा पैसा लागला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. यावेळी त्यांच्याकडून पैसा लावणारे जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. मात्र या पोस्ट मुळे आपल्या कुटुंबाची प्रतिमा मलीन झाली. केवळ स्वतःच्या राजकारणासाठी माझ्या फोटोचा वापर नवाब मलिक यांनी केला असल्याचा आरोप अमृता फडणवीस यांच्या कडून करण्यात आला. या पोस्टच्या विरोधात अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.
काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडून अमृता फडणवीस यांचा 'डान्सिंग डॉल' उल्लेख -

काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, भाजपच्या नेत्यांनी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी यांची उपमा दिली असेल तर त्या खूपच नशीबवान आहेत. राबडीदेवी या चूल, मूल आणि घर सांभाळणारी स्त्री होती. बरं झालं, भाजपवाल्यांनी रश्मी ठाकरे यांना फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाहीतर लोकांसमोर रश्मी ठाकरे यांची प्रतिमा 'डान्सिंग डॉल'सारखी (Amrita Fadnavis called Dancing Doll) गेली असती. दरम्यान या वक्तव्यावरून राजकारण तापल्याचे पहायला मिळत आहे. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अमृता फडणवीस या चांगल्या डान्स करतात म्हणून त्यांना आपण डान्सिंग डॉल असे म्हटले, असं विद्या चव्हाण या म्हणाल्या आहेत. याला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, ज्यांच्यावर सुनेचा कौटुंबिक हिंसाचार व मानसिक छळ केल्याचा गुन्हा नोंद आहे, त्या मला डान्सिंग डॉल म्हणतात. असे ट्विट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details