मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानभवनात विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र सभागृहाबाहेरील शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष अद्याप सुरु आहे. व्हीप मोडल्याप्रकरणी ठाकरे गटातील 14 आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले ( Chief Whip Bharat Gogawale ) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली ( Disqualification Notices Sent To All MLAs ) आहे. याबाबतचे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. मात्र, पत्रात आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांचे नाव वगळण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे गटनेते प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे, असे आदेश सर्वांना देण्यात आलं होते. त्यानंतर, बंडखोर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या आमदारांना राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्यात आलेला. मात्र, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील 15 आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे व्हिप मोडणाऱ्या आमदारांविरोधात शिंदे गटाते प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.
एएनआयशी बोलताना भरत गोगावले म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आणि विचार करुनच त्यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव वगळलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतील, असेही गोगावले यांनी म्हटलं आहे.
विधीमंडळाचे पत्र -विधानभवन सचिवालयानं रविवारी ( 3 जुलै ) एक पत्र जाहीर केलं. त्यामध्ये एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ शिवसेनेचे गटनेते असतील. भरत गोगावले यांनाही पत्र पाठवण्यात आलं. त्यात 22 जूनला पत्र प्राप्त झालं. त्यानुसार एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते आहेत. भरत गोगावले हे पक्षाचे प्रतोद आहेत.
अरविंद सावंत काय म्हणाले?- गेल्या वेळी शिंदे गटाविरोधात असेच प्रकरण कोर्टात गेले होते. शिंदे गटावरती केलेली कारवाई विधानसभा उपाध्यक्षांनी चुकीची आहे. असे म्हणत त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्या ठिकाणी शिंदे गटाचा मोठा विजय झाला. कोर्टाचा निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने आला. उद्धव ठाकरे यांना बाजू लढवायची असेल तर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जावं लागेल. सध्या संविधानाची टिंगल उडवायचं काम चालू आहे. हा निर्णय चुकीचा आहे, गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षाच्या प्रमुखांचा असतो, त्यामुळे असा निर्णय होणे अपेक्षित नव्हते, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रविवारी ( 3 जुलै ) या निर्णयावर केली आहे. यांना वेळ काढूपणा करायचा आहे. त्यामुळेच असे निर्णय येत आहेत, असा आरोप ही सावंत यांनी केला आहे, तसेच शिवसेना या निर्णयाला आव्हान ही देणार आहे, आम्ही शांत राहणार नाही, असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरेंसोबत असणारे आमदार - सुनील प्रभू, नितीन देशमुख, राहुल पाटील, वैभव नाईक, सुनील राऊत, रवींद्र वाईकर, भास्कर जाधव, संजय पोतनीस, अजय चौधरी, दिलीप लांडे, प्रकाश फातेरपेकर, राजन साळवी व कैलास पाटील
हेही वाचा -Ajit Pawar : अजित पवारांचा शिंदे-भाजप सरकारला टोमणा; म्हणाले, 'सभागृहात एक बोलायचे...'