मुंबई -मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रकात ( Summer Session Exam Schedule ) बदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र मुंबई विद्यापीठाने( Mumbai University ) या चर्चेला पूर्णविराम देत, विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या ( Summer Session Exams 2022 ) आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून ठरलेल्या वेळेतच विद्यापीठांच्या परीक्षा( Exam Fever 2022 ) होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार 15 मिनिटे अधिकचा वेळ :उन्हाळी सत्राच्या परीक्षाकरीता मुंबई विद्यापीठामार्फत 23 फेब्रुवारी 2022 आणि 4 मार्च 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रक आणि मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगाने परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच परीक्षा सुरू होण्याच्या तारखाबाबत विद्यापीठाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकात नुसारच परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. यानुसार विद्यापीठाच्या काही परीक्षा या 25 मार्च 2022 रोजी पासून सुरू करण्यात आलेल्या आहेत. यापुढील सुरू होणाऱ्या परीक्षा या जाहीर केलेल्या पॅटर्ननुसार व तारखेनुसार आयोजित केले जाणार आहे. तसेच ज्या परीक्षांचे आयोजन ऑफलाइन पद्धतीने केले जाणार आहे, अशा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रतितास पंधरा मिनिटे अधिकचा वेळ देण्यात येईल. याशिवाय दोन पेपर्स मध्ये दोन दिवसाचे अंतर ठेवण्यात येईल. सध्या विद्यार्थ्यांना प्रश्न संच उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
Exam Fever 2022 : उन्हाळी परीक्षांच्या आयोजनात कोणताही बदल नाही - मुंबई विद्यापीठ - परीक्षांच्या आयोजनात कोणताही बदल नाही
मुंबई विद्यापीठाने ( Mumbai University ) या चर्चेला पूर्णविराम देत, विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या ( Summer Session Exams 2022 ) आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून ठरलेल्या वेळेतच विद्यापीठांच्या परीक्षा ( Exam Fever 2022 ) होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे.
मुंबई विद्यापीठ संग्रहित छायाचित्र