मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला मीडियाने खुप वजन दिले आहे. सध्या वेगवेगळ्या वादांमुळे मुंबई पोलिसांच्या तपासात अडथळा येत आहे. यात राजकारण आल्याने पोलिसांवर दबाव आला आहे. सुशांतसिंह संदर्भात कोण बरोबर आहे? कोण चुकीचे आहे? हे तपासातून समोर येईल. बिहार पोलिसांना त्यांच्याकडे दाखल झालेला गुन्हा हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावाच लागेल कारण ही घटना मुंबईत घडली असून मुंबई पोलीस याचा तपास करीत आहेत, असे मत माजी मुंबई पोलीस आयुक्त व माजी पोलीस महासंचालक डीजी पसरीचा यांनी व्यक्त केले.
विशेष : बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्ड माफियांचा हस्तक्षेप, माजी पोलीस महासंचालक डीजी पसरीचा - mumbai d g pasaricha news
सुशांतसिंह प्रकरणी मोठ्या प्रमाणात राजकारण आल्याने पोलिसांवर दबाव आला आहे. ९७ ते ९९ च्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गँगवार होते. त्या काळी अंडरवर्ल्ड माफिया आपला काळा पैसा बॉलिवूडमध्ये गुंतवत होता. आमच्याकडे या संदर्भात फोटोग्राफ, फोन कॉल रेकॉर्ड होते, असं माजी पोलीस महासंचालक डीजी पसरीचा यांनी म्हटले आहे.

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड, अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी त्यांनी ईटीव्ही भारतकडे त्यांनी विशेष मुलाखती दरम्यान आपले मत मांडले आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
बॉलिवूडमध्ये आहे अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप
सुशांतसिंह प्रकरणी मोठ्या प्रमाणात राजकारण आल्याने पोलिसांवर दबाव आला आहे. ९७ ते ९९ च्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गँगवार होते. त्या काळी अंडरवर्ल्ड माफिया आपला काळा पैसा बॉलिवूडमध्ये गुंतवत होता. आमच्याकडे या संदर्भात फोटोग्राफ, फोन कॉल रेकॉर्ड होते, असं माजी पोलीस महासंचालक डीजी पसरीचा यांनी म्हटले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पार्टीत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार हे त्या काळी जात होते. त्यावेळी एखादा चित्रपट निर्माता त्याचा चित्रपट प्रदर्शित करायला जात असेल तेव्हा दुसरा निर्माता हा अंडरवर्ल्डच्या माध्यमातून संबंधित निर्मात्याला धमकी देऊन त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलायला लावत असे. एखाद्या वक्तीला चित्रपटात हिरो किंवा हिरोईन म्हणून घ्या म्हणून निर्मात्याला धमकावले जात होते. बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे ही गटबाजी स्पर्धेमुळे निर्माण झाली आहे. प्रत्येक जण यात एक्सपर्ट बनून आपापले मत मांडत आहे. हे दुर्दैवी असून पोलिसांना त्यांचा तपास करू द्यायला हवा. या प्रकरणी प्रत्येक गोष्ट ही रेकॉर्ड वर येणारच आहे असं पसरीचा यांनी म्हटलंय.
९० च्या काळातली परिस्थिती आता बदलली असल्याचे डीजी पसरिचा यांचे म्हणणे आहे. बॉलिवूड मध्ये पूर्वी सारखा माफियांचा हस्तक्षेप आता राहिलेला नाही . दाऊद इब्राहिम , छोटा राजन सारखे अंडरवर्ल्ड डॉन आता क्रियाशील राहिलेले नाहीत. बिहार पोलिसांकडे दाखल झालेला गुन्हा हा शून्य तत्वावर दाखल व्हायला हवा असं डीजी पसरीचा यांचं म्हणणं आहे. यात राजकारण आल्याने विषयाचा मोठा बाऊ करण्यात आला आहे. बिहार मधील मोठा अधिकारी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याला नियमानुसार क्वारंटाईन करण्यात आले आहे. ही गोष्ट वरिष्ठ पातळीवर हाताळायला हवी असं डीजी पसरीचा यांनी म्हटले आहे.
कोण आहेत डीजी पसरीचा
१९७० च्या बॅचचे असलेलं डीजी पसरीचा यांनी २००३ साली मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरील ते दुसरे शीख अधिकारी म्हणून ओळखले जात होते. २००४ साली ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून होते . १९९७ ते १९९८ या काळात त्यांनी मुंबई पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था या पदावर काम केले आहे.