महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sachin Waze Demands Meat : अंडी आणि मांसाहाराचे जेवण द्या, सचिन वाझेंची एनआयएच्या विशेष कोर्टात याचिका - Single Razor To Shave

अटकेत असलेले वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयएच्या विशेष कोर्टात याचिका दाखल ( Petition filed In Special NIA Court ) केली आहे. 'माझे ऑपरेशन झाले असून, मला अंडी व मांसाहाराचे जेवण मिळावे' ( Sachin Waze Demands Meat ), अशी मागणी त्याद्वारे करण्यात आली आहे.

सचिन वाझे
सचिन वाझे

By

Published : Dec 15, 2021, 1:09 PM IST

मुंबई- मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटक प्रकरण ( Antilia Bomb Scare Case )आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात ( Mansukh Hiren Murder Case ) अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी विशेष एनआयए न्यायालयात पौस्टिक जेवण मिळावे ( Sachin Waze Demands Meat ) या करिता मंगळवार (दि.14) रोजी याचिका दाखल ( Petition Filed In Special NIA Court ) केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यांपूर्वी ओपन हार्ट सर्जरी

सचिन वाझेवर दोन महिन्यांपूर्वी ओपन हार्ट सर्जरी ( Open Heart Surgery ) करण्यात आली आहे. वाझेला डॉक्टरांनी नियमित फिजिओथेरपी आणि उच्च प्रोटीनयुक्त आहार ( High Protein Meal ) घेण्याचा सल्ला दिल्याचे याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे आता वाझेने न्यायालयात धाव घेतली आहे. आजारपणाचे कारण पुढे करत त्याने घरचे जेवण व फिजिओथेरपीसाठी ( Home Meals Physiotherapy ) परवानगी मागितली आहे. तसेच खाजगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मागितली आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाची परवानगी आवश्यक

कैद्यांना ही सवलत दिली जात नाही. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. वाझेला मागील सुनावणीवेळी घरच्या जेवणाला परवानगी जरी दिली असली, तरी त्याला घरातून पाठवलेली अंडी आणि मांसाहार खाण्यास मनाई आहे. त्यासाठी वाझेने न्यायालयात अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे कारागृहात दाढी करण्यासाठी एकच वस्तरा ( Single Razor To Shave ) वापरला जात असल्याचे सांगत, त्याने खाजगी ट्रिमर वापरण्याची परवानगी मिळावी अशी मागणीही याचिकेत केली आहे.

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयाकडून राज कुंद्राला दिलासा; 4 आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details