मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. देशात एकीकडे करोनाचा फैलाव रोखण्याचं आव्हान असताना दुसरीकडे आरोग्य सुविधांचा तुटवडा हे आव्हान आहे. ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू सध्या सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
'कोरोना संकटात सगळंच रामभरोसे आहे' - केंद्र सरकार
मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही असं ट्विट करत संदीप देशपांडेंनी सरकारला टोला लगावला आहे.
मनसेने पुन्हा एकदा राज्य सरकारवर आरोप केले असून राज्य सरकारवर आरोप करताना केंद्र सरकारला देखील टोला लगावला आहे. लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही असं ट्विट करत संदीप देशपांडेंनी सरकारला टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे राज्यात लस नाही असं म्हणत आहेत आणि रेकॉर्डब्रेक लसीकरण देखील केले जात आहे हे कसं शक्य होतं. आम्ही पहिल्यापासून सांगितलं होतं की टेस्ट कमी झाल्या की रुग्ण कमी होतात आणि आता तेच घडत आहे. टेस्ट वाढल्या की रुग्ण वाढतील असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील कोरोबाधितांच्या प्रमाणात काही अंशी घट
राज्यातील कोरोबाधितांच्या प्रमाणात काही अंशी घट झाल्याचे चित्र आहे. मात्र अद्यापही धोका टळलेला नाही. सोमवारी दिवसभरात राज्यामध्ये 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचले असून, दिवसभरात कोरोनामुळे 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सोमवारी 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 47 लाख 71 हजार 022 पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या 40 लाख 41 हजार 158 वर पोहचली आहे. तर दिवसभरात 567 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्ण सक्रिय आहेत.