महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारावीत प्रत्येकाची कोरोना टेस्ट; खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने कोरोनावर मात

धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत जी-उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हा निर्णय घेतलाय.

By

Published : Apr 9, 2020, 7:57 PM IST

corona in dharavi
धारावीत प्रत्येकाची कोरोना टेस्ट; खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने कोरोनावर मात

मुंबई- धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत जी-उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हा निर्णय घेतलाय. खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धारावीतील 150 खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखवली. यामुळे येत्या 10-12 दिवसांत संपूर्ण धारावी परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी करणे पालिकेला शक्य होणार आहे.

धारावीत प्रत्येकाची कोरोना टेस्ट; खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने कोरोनावर मात

धारावीवरील कोरोनाचे संकट गडद होत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले होते. या आवाहनाला, इंडियन मेडिकल काऊन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने धारावीतील 150 खासगी डॉक्टर्स पालिकेच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना खासदार राहुल शेवाळे यांनी दोन खासगी डॉक्टर्स आणि तीन पालिका वैद्यकीय कर्मचारी असे पाच जणांचे पथक तत्काळ सक्रिय होणार असल्याची माहिती दिली. संबंधित पाच डॉक्टर्स जवळपास 5000 नागरिकांची चाचणी करणार आहे. अशा पथकांच्या माध्यमातून 10- 12 दिवसंत धारावीतील सुमारे साडेसात लाख नागरिकांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशा रीतीने त्वरित निदान झाल्यास बाधितांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उपचारासाठी दाखल केले जाईल. तसेच लक्षणे आढळणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, असे शेवाळे म्हणाले. याचसोबत धारावी पोलीस ठाणे आणि रुग्णालयांच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेल लवकरच उभारण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.

साहाय्यक आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत खासदार शेवाळे, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल काऊन्सिलचे उपाध्यक्ष डॉ.अनिल पाचनेकर, डॉ. सुरेंद्र सिगनापूरकर यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details