Rane v. Thackeray : 'मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात', निलेेश राणेंचे वादग्रस्त ट्विट - मनोहर पर्रीकर
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session of the State Legislature) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) तब्येत बरी नसल्यामुळे अनुपस्थित आहेत. यात आता माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane) यांनी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा त्यांच्या आजारपणातला एक फोटो ट्विट करत ते मुख्यमंत्री असताना शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होते. असे सांगत महाराष्ट्राचे 'मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात' असे सांगितले आहे.
![Rane v. Thackeray : 'मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात', निलेेश राणेंचे वादग्रस्त ट्विट Nilesh rane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14004675-754-14004675-1640404365063.jpg)
निलेेश राणें
मुंबई:गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. पण १ दिवस सुद्धा ते घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात.अशा आषयाचे ट्विट निलेश राणेनी करत मुख्यमंत्र्यावर निशाना साधला आहे.