महाराष्ट्र

maharashtra

Rana Couple Bail : जामीन मिळाल्यानंतरही राणा दाम्पत्याची आजची रात्र तुरुंगात, 'हे' आहे कारण

By

Published : May 4, 2022, 10:05 PM IST

आज न्यायालयाने राणा दाम्पत्याला ( Bail Grant To Rana Couple ) काही अटींवर जामीन मंजूर केला. मात्र, तळोजा कारागृहात ( Rana Couple In Taloja Jail ) त्यांच्या जामीनाच्या ऑर्डरची कॉपीच पोहोचली नाही. त्यामुळे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Navneet Rana ) यांना आजची रात्रही कोठडीतच काढावी लागणार आहे.

Rana Couple Bail
Rana Couple Bail

मुंबई -खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर ( Bail Grant To Rana Couple ) केल्यानंतरदेखील आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. राणा दाम्पत्य यांना मुंबईतील तळोजा ( Rana Couple In Taloja Jail ) कारागृहात ठेवण्यात आलं होतं. आज न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला. मात्र, तळोजा कारागृहात त्यांच्या जामीनाच्या ऑर्डरची कॉपीच पोहोचली नाही. त्यामुळे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Navneet Rana ) यांना आजची रात्रही कोठडीतच काढावी लागणार आहे. नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेजे रुग्णालयात दाखल ( Navneet Rana In JJ Hospital ) करण्यात आलं आहे. त्यामुळे आज नवनीत राणा रुग्णालयात तर रवी राणा हे तळोजा कारागृहात मुक्कामी असतील.

आजची रात्र कारागृहात -राणा दाम्पत्याला जरी जामीन मंजूर झाला असला तरी, कारागृहाच्या लेटर बॉक्समध्ये 5.30 च्या आधी रिलीझ ऑर्डर पडणं आवश्यक असतं. या प्रक्रियेला संपूर्ण विलंब होत आहे. तत्पूर्वी राणा दाम्पत्याला ज्या दिवशी अटक करण्यात आली, तो दिवस शनिवार होता आणि दुसऱ्या दिवशी रविवार. यासाठी त्यांची न्यायालयीन कोठडी मिळवण्यासाठी त्यांना सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होत. सुट्टी कालीन न्यायालय हे वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात बसलं होत, त्यामुळे त्या प्रभागातली सर्व प्रकरणं येथे वर्ग करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण मुळात बोरिवली न्यायालयात जाणं अपेक्षित होत. त्यामुळे रविवारची रिमांड झाल्यानंतर सर्व कागदपत्रे कायद्यानुसार बोरिवली न्यायालयाकडे सोपवण्यात आली. हे पाहता तांत्रिकदृष्ट्या बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाकडून कोठडीत होते. त्यामुळे त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असूनही त्यांना ज्या न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यासमोर जाणं आवश्यक आहे. त्यानुसार दंडाधिकारी न्यायालय मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार ऑर्डर काढतात. मग ही ऑर्डर घेऊन ती कारागृहात जमा करावी लागते. यानंतर आरोपीला तुरुंगातून सोडण्यात येत. मात्र, या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याने त्यांना आजची रात्र तुरुंगात काढावी लागू शकते.

या अटींवर सुटका -दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. याशिवाय या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. न्यायालयाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे.

हेही वाचा -Sandeep Deshpande Absconding : मनसे नेते संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोधाशोध सुरु

ABOUT THE AUTHOR

...view details