महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ETV Impact : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर शिक्षक पुरस्कारांसाठी मुलाखती सुरू - Interviews begin for BMC Mayors Teacher Awards

आयुक्तांच्या मंजुरीविना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरवर्षी दिले जाणारे, महापौर शिक्षक पुरस्कार यावेळी रखडलेले (Interviews begin for BMC Mayors Teacher Awards) होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व दहा हजार शिक्षकांमध्ये उत्कंठा आहे की, पुरस्कार कधी दिले जातील. याबाबत ईटीव्ही वतीने बातमी प्रसिद्ध झाली होती. अखेर महापालिकाने मनावर घेतले असून आता शिक्षकांच्या महापौर पुरस्कारासाठी मुलाखती घेणे सुरू केलेले (ETV Impact Interviews begin for Teacher Awards) आहे.

Interviews begin for BMC Mayors Teacher Awards
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर शिक्षक पुरस्कारांसाठी मुलाखती

By

Published : Sep 22, 2022, 5:36 PM IST

मुंबई :आयुक्तांच्या मंजुरीविना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरवर्षी दिले जाणारे, महापौर शिक्षक पुरस्कार यावेळी रखडलेले (Interviews begin for BMC Mayors Teacher Awards) होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व दहा हजार शिक्षकांमध्ये उत्कंठा आहे की, पुरस्कार कधी दिले जातील. याबाबत ईटीव्ही वतीने बातमी प्रसिद्ध झाली होती. अखेर महापालिकाने मनावर घेतले असून आता शिक्षकांच्या महापौर पुरस्कारासाठी मुलाखती घेणे सुरू केलेले (ETV Impact Interviews begin for Teacher Awards) आहे.



दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पुरस्कार सोहळा फारसा उत्साहाने झालाच नाही. यंदा सर्व सणवार जल्लोषात साजरे होत आहेत. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या मंजुरीविना महापौर शिक्षक पुरस्कार रखडले असल्याची चर्चा दबक्या आवाजात शिक्षण क्षेत्रात सुरू होती. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील काही दिवसातच मुलाखतीनंतर शिक्षकांना महापौर पुरस्कार जाहीर केले (ETV Impact Interviews begin) जातील.


महापौर शिक्षक पुरस्कारासाठी 103 शिक्षकांची प्रतीक्षा -बृहन्मुंबई महानगरपालिकेने महापौर पुरस्कार यासाठी 11 जुलै ते 16 जुलै या कालावधीत पुरस्कारासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करण्याची सूचना महानगरपालिकेने केली होती. साधारणतः 103 च्या आसपास सर्व स्तरातील शिक्षकांनी अर्ज भरले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. शिक्षक सभेचे नेते के.के. सिंग यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, यंदा महापरीक्षक पुरस्कार उशिरा होत आहेत. आता त्यांच्या मुलाखती सुरू झाल्या असून दोन-तीन दिवस या मुलाखती चालतील. त्यानंतर महापूर शिक्षक पुरस्कार घोषित होतील. मात्र कुठल्याही एका भाषेच्या शिक्षकांना झुकत माप देऊ नये. सर्व भाषेच्या शिक्षकांना समान न्याय यामध्ये देण्यात यावा, अशी मागणी देखील त्यांनी केलेली (Interviews begin for BMC Mayors Teacher Awards) आहे.


महापौर शिक्षक पुरस्कार निवड अशी होते -राज्यपाल किंवा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्य शिक्षण अधिकारी, सहाय्यक आयुक्त शिक्षण महापालिका, तसेच शिक्षण विभागाचे उपशिक्षणा अधिकारी, शिक्षण समिती अध्यक्ष पण यंदा महापालिकेवर प्रशासक नेमलेले असल्यामुळे शिक्षण समिती अध्यक्ष मुलाखत घेण्यासाठी नसतील. विविध विषयातील शिक्षकांच्या कला गुणांना पाहून सुमारे ५० शिक्षकांची निवड केली (BMC Mayors Teacher Awards) जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details