हैदराबाद : आज आपण महिलांवर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलणार आहोत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांविरोधात महिलांना आवाज उठवता यावा, यासाठी केंद्र सरकारने 2013 मध्ये 'पॉश' हा कायदा आणला. या कायद्यानुसार महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराविरोधात संरक्षण पुरविण्यात आले आहे. मात्र हा कायदा लागू होऊन आठ वर्षं झाली, तरी या कायद्याविषयी कित्येक महिलांना अद्यापही माहिती नाही. किंवा जरी कायद्याबाबत माहिती असेल, तरी त्यातील तरतुदी किंवा प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती त्यांना नाही. त्यामुळेच आज महिला दिनाचे औचित्य साधून, या कायद्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतने खास चर्चासत्राचे आयोजन केले आहे. कायदेतज्ञ सुजाता पाठक, सोलापूर वाहतूक शाखेच्या उपायुक्त दिपाली घाडगे आणि 'पॉश'च्या एक्स्टर्नल कमिटीच्या सदस्या अरीना पाखरे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
पहिल्या भागात अॅडव्होकेट सुजाता पाठक यांनी पॉश कायद्यातील तरतुदी, प्रक्रिया आणि शिक्षा याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच संस्था किंवा आस्थापनांमध्ये असणाऱ्या महिला तक्रार निवारण समितीसंदर्भात अरीना पाखरे यांनी माहिती दिली आहे.
जाणून घ्या काय आहे PoSH कायदा : भाग १ दुसऱ्या भागामध्ये आपण पॉश कायद्याअंतर्गत किती आणि कशा प्रकारच्या तक्रारी येतात आणि त्यावर कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबद्दल पोलीस अधिकारी दिपाली घाडगे यांच्याशी चर्चा केली. तसेच कामाच्या ठिकाणी संरक्षणाचे कवच मिळण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र खरेच या समितीकडून तसे काम होते का? या समित्या महिलांना संरक्षण पुरविण्यासाठी सक्षम ठरतात का? याबद्दल बोलत आहेत अरीना पाखरे.
जाणून घ्या काय आहे PoSH कायदा : भाग २ कित्येक वेळा महिलेने समितीकडे तक्रार करूनही त्यावर केवळ जुजबी कारवाई केली जात असल्याचेही समोर येते. अशा परिस्थितीत संबंधित संस्थेवर कारवाई होते का? किंवा संबंधित समितीवर कारवाई होते का? अशा परिस्थितीत महिलेने काय केले पाहिजे? याबद्दल अरीना पाखरे यांनी तिसऱ्या भागात विस्तृत सांगितले आहे. तसेच, संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या कायद्यामुळे संरक्षण मिळू शकते. मात्र असंघटीत क्षेत्रात, छोट्या दुकानांमध्ये किंवा मजूरी करणाऱ्या महिलांसाठी अशा प्रकारची काही तरतूद आहे का? अशा महिलांनी काय केले पाहिजे? आणि हा कायदा अस्तित्वात आहे, याबद्दलची समाजात जनजागृती करण्यासाठी काय पावले उचलली जाऊ शकतात, याबद्दल त्यांच्या अनुभवाच्या आधारे पोलीस अधिकारी दिपाली घाडगे यांनी माहिती दिली आहे.
जाणून घ्या काय आहे PoSH कायदा : भाग ३ हेही वाचा :महिला दिन विशेष : कोल्हापुरातल्या एकाच कुटुंबातील सहा मुली झाल्या पोलीस