आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
आजपासून शाळांची घंटा वाजणार; 'अशी' असेल व्यवस्था
दीड वर्षाच्या अंतरांनंतर शाळा पून्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे राज्यातील शाळा बंद आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रियंका गांधी लाखीमपूर खीरी घटनास्थळी जाऊन निषेध नोंदवणार
उत्तरप्रदेशमधीरल लखीमपूर खीरीत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी मध्यरात्रीच लखीमपूरकडे रवाना झाल्या आहेत. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळी न जाण्यास सांगितले होते. मात्र प्रशासनाकडे कोणताही आदेश आणि वॉरेंड न नसल्याने प्रियंका गांधी न जुमानता लखीमपूरकडे रवाना झाल्या असून घटनेचा निषेध नोंदवणाार आहे.
अखिलेश यादव लाखीपूरला देणार भेट
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव लाखपूरला भेट देणार आहे.
IPL सामना
दिल्ली कॅपिटल विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार सामना
कालच्या महत्वाच्या बातम्या -
लखीमपूर खीरी हत्याकांत : भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर चढवली गाडी; आठ जणांचा मृत्यू
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे.
प्रियंका गांधी आक्रमक : प्रशासनाला न जुमानता मध्यरात्रीच लखीमपूरकडे रवाना
उत्तरप्रदेशमधीरल लखीमपूर खीरीत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी मध्यरात्रीच लखीमपूरकडे रवाना झाल्या आहेत. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळी न जाण्यास सांगितले होते. मात्र प्रशासनाकडे कोणताही आदेश आणि वॉरेंड न नसल्याने प्रियंका गांधी न जुमानता लखीमपूरकडे रवाना झाल्या.
शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा क्रुर प्रकार; शरद पवारांकडून घटनेचा तीव्र निषेध
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडाडून निषेध करण्यात आला आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा क्रुर प्रकार असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांनी ट्विट करून या घटनेबाबत निषेध नोंदवला आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपला निषेध नोंदवला आहे.
Drugs Party Case : आर्यन खानसह तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडी
मेडिकल तपासणीनंतर त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आले आहे. दरम्यान आर्यन खानसह तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडी मिळाली आहे. याच दरम्यान त्यांच्या मोबाइलची देखील तपासणी केली जाणार आहे.
खड्डा चुकविण्याच्या नादात भीषण अपघात; सख्ख्या बहीण-भावासह चार ठार, एक गंभीर
अमरावती-नागपूर रोडवरील बाजारगाव जवळ झालेल्या अपघातात चार ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारने सर्व्हिस रोडवर बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच प्रवाशांना जबरी धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीसह एका मुलाचा समावेश आहे.