आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
पंजाबमध्ये किसान मजदूर संघाचे आज रेल रोको आंदोलन
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे संमत केले आहेत. या कायद्यांविरोधात मागील वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकारने अजूनही आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे नुकताच भारत बंद आंदोलन करण्यात आले होते. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पंजाबमध्ये किसान मजदूर संघ रेल रोको आंदोलन करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी CIPET चे करणार लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज CIPET चे लोकार्पण करणार आहे. ते मेडिकल कॉलेजचे देखील भूमीपूजन करणार आहेत.
आज जेएनयूचा दीक्षांत समाोह, धर्मेंद्र प्रसाद यांची मुख्य उपस्थिती
IPL सामने
आज सायंकाळी साडे सात वाजता सनराईज हैदराबाद विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यादरम्या सामना रंगणार आहे. हा सामना शरजाह क्रिकेट स्टेडियम, शरजाह येथे होणार आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुसळधार पावसामुळे राज्यातील 82 टक्के धरणं भरली
मागील गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणार्या पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याने अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, नाशिक विभागाच्या १४१ मोठे, २५८ मध्यम आणि दोन हजार ८६८ लघू पाटबंधारे प्रकल्पात ३३ हजार ८०४.३३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी याच तारखेस हा साठा ९० टक्के इतका होता.
एकनाथ खडसेंविरुद्ध ईडीची कारवाई!.. फार्महाऊस सील केल्याची चर्चा, रोहिणी खडसेंकडून स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर आज (बुधवारी) ईडीने कारवाई केल्याची जोरदार चर्चा दुपारपासून जिल्ह्यात सुरू आहे. खडसेंचे फार्महाऊसही सील केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चेला कुठेही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंनी सायंकाळी या चर्चेचे खंडन केले. खडसे कुटुंबीयांवर आज ईडीने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही किंवा मालमत्ता जप्त केलेली नाही. कामानिमित्त खडसे बाहेरगावी गेले आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे रोहिणी खडसेंनी स्पष्ट केले.
अमरिंदर सिंग-अमित शाह यांची दिल्लीत भेट; कॅप्टन म्हणाले, शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा!
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा 18 सप्टेंबरला राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसवर नाराज आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात अमरिंदर सिंग यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच ते दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अमरिंदर सिंग यांचा दिल्ली दौरा हा खासगी असल्याचे त्यांच्या माध्यम सल्लागाराने स्पष्ट केले होते.
काँग्रेसमध्ये कोणीही अध्यक्ष नाही, कुणीतरी निर्णय घेते- सिब्बल यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका
काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये कोणीही अध्यक्ष नाही. मात्र, निर्णय कोणीतरी घेत असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या हायकमांडने काँग्रेस कार्यकारी समितीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
न्यायालयाने फेटाळला विनंती अर्ज, सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी
निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेची "बायपास शस्त्रक्रियेमधून बरे होण्यासाठी राहत्या घरी नजरकैद ठेवण्यासाठीची मागणी करणारा विनंती अर्ज फेटाळला एनआयए न्यायालयाने फेटाळला आहे. सचिन वाझे यांना तुरुंगातील रुग्णालयाच्या कक्षात ठेवण्यात येईल, घरगुती जेवणाची परवानगी असेल आणि गरज असेल तेव्हा जेजे रुग्णालयात नेले जावे, अशा सूचनाही न्यायालायने केल्या आहेत.