महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आज कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता, वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - etv bharat top news

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

कन्हैया कुमार
कन्हैया कुमार

By

Published : Sep 28, 2021, 4:42 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • नवी दिल्ली - कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी आज काँग्रसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
  • मुंबई- गुलाब चक्रीवादळामुळे राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता
  • दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतील शाळांमध्ये देशभक्ती आधारित अभ्यासक्रमाचा शुभारंभ करणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित राहील.
  • IPL सामने - आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराईझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या सामना रंगणार

कालच्या महत्त्वाच्या बातम्या

  • मुंबई- वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रुटी दूर करून ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सूचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे.
  • ठाणे- ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या अज्ञातवासात असलेले परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यावर एकामागे एक गुन्हे दाखल होत आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या खंडणीचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याचा तपास आता सीआयडी करणार आहे.
  • अफगाणिस्तातान- लिबानींची 1996 ते 2001 मध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्ता होती. या काळात तालिबानींनी दाढी करण्यावर आणि अमेरिकन स्टाईलप्रमाणे दाढी कट करण्यावर बंदी लागू केली होती. याच नियमाची तालिबानींनी पुनरावृत्ती केली आहे.
  • पणजी -गोवा काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह हा पराकोटीला पोहोचला आहे. त्यामुळे कंटाळून गोव्याचे माजी मुख्यमंत्री हे तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावरून काँग्रेसवर निशाणा साधण्याची संधी सोडलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details