महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वच्छ भारत मिशनचा शुभारंभ, वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

etv bharat top new
etv bharat top new

By

Published : Oct 1, 2021, 6:02 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

वीज बिल, फोन रिचार्ज संदर्भात आजपासून नवी नियमावली होणार लागू

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली कालमर्यादा समाप्त होत आहे. त्यानुसार शुक्रवारपासून वीज बील, फोन रिचार्ज भरण्यासह इतर सेवांसाठी काही नियम लागू होणार आहे. त्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे आरबीआय जारी करणार आहेत.

कोलंबियाचे उपराष्ट्रपती नवी दिल्ली दौऱ्यावर

आजपासून कोलंबियाचे उपराष्ट्र दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत आर्थिक विकाससबंधित शिष्टमंडळ सुद्ध आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वच्छ भारत मिशनचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये स्वच्छ भारत मिशन-अर्बन आणि अटल नूतनीकरण आणि शहरी परिवर्तन मिशन (AMRUT) चा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. सरकारच्या मते, SBM-U 2.0 चा खर्च सुमारे 1.41 लाख कोटी रुपये आहे.

IPL सामना- आज IPL मध्ये कोलकाता नाईड राीटर्स आणि पंजाब किंग्ज यांच्याात लढत

कालच्या महत्वाच्या बातम्या -

राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयकडून समन्स

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे नक्की कोणत्या कारणास्तव दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा केली होती. आता दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआय कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. मात्र सीबीआय कार्यालयात जाण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे समजते.

मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वे डब्यांची चाचणी मरोळ मरोशी येथे केली जाणार आहे. ही चाचणी करताना आरेतील एकाही वृक्षाला धक्का लागू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुंबईत लसीकरणाचा विक्रम : सप्टेंबर महिन्यात २९ लाख ५१ हजार १५७ लसीचे डोस

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सप्टेंबर महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात २९ लाख ५१ हजार १५७ डोस दिले गेले आहेत. यामध्ये शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचांही समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाहांची घेतली भेट; गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा

गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोवा राज्याचे भाजप निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत गोवा विधानसभा निवडणुकीबाबत शाह यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

खुशखबर! रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पुन्हा होणार खुली; पाहायला मिळणार 'ही' मनोरंजनाची ठिकाणे

पर्यटकांकरिता आनंदाची बातमी आहे. रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता खुली होणार आहे. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी अशी ओळख असलेली रामोजी फिल्म सिटी 2 हजार एकरांमध्ये आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना, परिपूर्ण हॉलिडे पॅकेज आणि विश्रांतीची ठिकाणे (leisure destination) असल्याने येथील सहल ही आनंदी आणि सुरक्षित असण्याची खात्री देते.

ABOUT THE AUTHOR

...view details