आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- कोरोनाबाबत मुख्यमंत्री घेणार बैठक
दक्षिण आफ्रिकेत सद्या कोरोना विषाणूचा नवा वेरियंट सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना संदर्भतील नवी नियामवली तयार करण्यात आली आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री कोरोनाबाबत आढावा बैठक घेणार आहे.
- भाजपा नेते आशीष शेलार यांची पत्रकार परिषद -
माजी मंत्री, आमदार आशीष शेलार यांची सकाळी 11.00 वाजता भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे.
- अजित पवार यांचा नाशिक दौरा -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक दिवसीय नाशिक ग्रामीण दौऱ्यावर आहेत. नाकोडे येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कामगार, महिला व युवक मेळाव्यात कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील १८३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवारी (ता. २८) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने कळवण येथे होणार आहे.
- आज परमवीर सिंग यांची पोलीस चौकशी -
कथित 100 कोटी खंडणी प्रकरणातील आरोपी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची पोलीस चौकशी होणार आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
- मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज शनिवारी 889 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 738 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई -कोरोनाचा नवीन व्हेरियंट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नवीन नियन व निर्बंध ( Maharashtra Govt issues fresh restrictions ) लागू केले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक ( RTPCR test for Maharashtra Journey ) असणार आहे. सविस्तर वाचा...
- अमरावती - येत्या मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, असा नवा दावा पुन्हा एकदा भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी राणे यांच्यावर टिका करत त्यांची खिल्लीही उडवली. दरम्यान काँग्रेसच्या नेत्या तथा कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनीही नारायण राणे यांच्या सत्ता बदलाच्या दाव्यावर प्रतिक्रिया देत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नैराश्यात गेले असल्याची टीका केली. सविस्तर वाचा...
- मुंबई - युरोप आणि साऊथ आफ्रिकेत पुन्हा कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. साऊथ आफ्रिकेत ओमिक्रोन (New Covid Variant Omicron) हा नवा कोरोना विषाणूचा व्हेरियंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC on Omicron Variant) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पालिकेने आरोग्य विभागाची (BMC Health Department) आज आढावा बैठक घेऊन सर्व रुग्णालये आणि कोविड सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा...
- ठाणे -मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागातील रेल्वे मार्ग कार्यान्वित व देखभाल दुरुस्तीसाठी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर कऱण्यात आले. सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -